Mumbai : मुंबईत महागड्या सायकली आणि दुचाकी मोटरबाईक चोरी करणारी टोळी गजाआड

16 महागड्या सायकली आणि 3 बाईक जप्त
Mumbai
Mumbaisakal

मुंबई : मुंबईतील कांदिवली पोलिसांनी महागड्या सायकल आणि दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरांच्या टोळक्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या 16 सायकली आणि 3 दुचाकी जप्त केल्या आहेत. सायकल चोरीच्या आरोपात कांदिवली पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नितीन मुळ्ये, राहुल पटेल,अक्षय गरूण अशी आरोपीची नावे आहे.

कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही आरोपी मुंबईतील हायप्रोफाईल उच्चभ्रू वस्ती असलेल्या भागात फिरून तेथील बाईक आणि महागड्या सायकल असलेली ठिकाणे हेरायचे . तेथून महागड्या सायकली किंवा बाईक चोरायचा आणि चोरलेल्या सायकली मालवणी परिसरात घेऊन जायचे आणि मिळेल त्या पैशात विकायचे.

या अटक आरोपींविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे मोबाईल स्नॅचिंगसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.यांच्या चोरीच्या अनेक घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाल्या आहेत. सध्या पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com