दीपिका पदुकोणचा फ्लॅट असलेल्या इमारतीला आग

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

इमारतीत 26 व्या मजल्यावर अभिनेत्री दिपीका पदूकोनचा फ्लॅट आहे. त्याचबरोबर, इतर कलाकारांचीही या इमारतीत घरे आहेत. प्राथमिक माहितीतून शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याची माहीती देण्यात आली आहे. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झालेली समोर आली नाही.

मुंबई - मुंबईतील डी मॉंट टॉवर, आप्पासाहेब मराठे मार्ग, वरळी, मुंबई येथे 33 व्या मजल्यावर भीषण आग लागली असून सदर घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे 7 फायर इंजिन, 5 वॉटर टँकर उपस्थित असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इमारतीतील जवळपास 90 ते 95 लोकांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

या इमारतीत 26 व्या मजल्यावर अभिनेत्री दिपीका पदूकोनचा फ्लॅट आहे. त्याचबरोबर, इतर कलाकारांचीही या इमारतीत घरे आहेत. प्राथमिक माहितीतून शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याची माहीती देण्यात आली आहे. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झालेली समोर आली नाही.

Web Title: mumbai fire breaks out in commercial premises at appasaheb marathe marg