मुंबईत NCB चं कार्यालय असलेल्या इमारतीला आग

पूजा विचारे
Monday, 21 September 2020

फोर्ट परिसरातील एक्सचेंज इमारतीला आग लागल्याची माहिती मिळतेय. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करत असलेल्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (एसीबी)कार्यालय देखील याच इमारतीत आहे. 

मुंबईः  फोर्ट परिसरातील एक्सचेंज इमारतीला आग लागल्याची माहिती मिळतेय. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करत असलेल्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (एसीबी)कार्यालय देखील याच इमारतीत आहे. 

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तातडीनं दाखल झाल्या आहे. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसंच अजूनही कोणतीही जीवितहानीचे वृत्त नाही आहे. 

मुंबईतील फोर्ट परिसरात ही इमारत असून याच इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)चं कार्यालय आहे. इमारतीत मुंबई एसआयटीचे अधिकारीही असल्याचं बोललं जात आहे. सध्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्स प्रकरणाची चौकशी या एनसीबीच्या कार्यालयात सुरु आहे. 

सारा, रकुल, सिमोन यांना या आठवाड्यात  समन्स पाठवणार? 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या(एसीबी) तपासात नावं पुढे आलेल्या सारा, रकुल,सिमोन या बॉलिवूड सेलेब्रिटींना या आठवड्यात समन्स पाठवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक हे सॅम्युअल मिरांडा तसेच दिपेश सावंतच्या माध्यमातुन ड्रग्ज तस्करांच्या होती. त्यानुसार, एनसीबीने मुंबई आणि गोवा येथे छापे मारले होते. आतापर्यंत याप्रकरणी 21  जणांना अटक केली आहे.

एनसीबीच्या चौकशीत रियाने सारा अली खान, रकुल प्रीत, डिझायनर सिमोन खंबाटा यांची नावे पुढे आली असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्याच्यापैकी कोणालाही अद्याप समन्स पाठवण्यात आलेला नाही. या आठवड्यात समन्स पाठवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Mumbai Fire breaks out in Exchange Building Ballard Estate


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Fire breaks out in Exchange Building Ballard Estate