मुंबई - कुर्ला परिसरातील झोपडपट्टीला आग

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

या आगीत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

मुंबई - मुंबईतील कुर्ला परिसरातील कपाडियानगर येथील झोपडपट्टीला आज (शनिवार) सकाळी आग लागली. या आगीत 7 ते 8 झोपड्या जळून खाक झाल्या असून, जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळीच कपाडियानगर येथील झोपडपट्ट्यांना भीषण आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.

या आगीत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: Mumbai Fire breaks out in Kurla's Kapadia Bazar

टॅग्स