अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग; 2 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबईः अंधेरीतील ईएसआयसी म्हणजेच कामगार रुग्णालयाला आज (सोमवार) दुपारच्या सुमारास आग लागली आहे. या आगीमध्ये दोघांना प्राण गमवावे लागले असून, 108 जण जखमी झाले आहेत. सायंकाळी 6च्या सुमारास आग आटोक्यात आली.

मुंबईः अंधेरीतील ईएसआयसी म्हणजेच कामगार रुग्णालयाला आज (सोमवार) दुपारच्या सुमारास आग लागली आहे. या आगीमध्ये दोघांना प्राण गमवावे लागले असून, 108 जण जखमी झाले आहेत. सायंकाळी 6च्या सुमारास आग आटोक्यात आली.

ईएसआयसी रुग्णालयाच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर आज दुपारी चारच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीत काही जण अडकले असल्याची भीती वर्तविली जात आहे. रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना शिडीने खाली उतरविण्याचे बचावकार्य अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. शिवाय, टेरेसवरून दोरखंडाच्या सहाय्याने आगीत अडकलेल्यांना इमारतीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या बचाव कार्यादरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू तर अग्निशमन दलाचा 1 जवान आणि 108 रुग्ण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, अंधेरीतील एमआयडीसी मरोळ परिसरातील कामगार रुग्णालयाला आज दुपारी चारच्या सुमारास आग लागली. याबाबतची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला कळविण्यात आल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीमुळे रुग्णालयातच्या चौथ्या मजल्यावर धुराचे लोट पसरले आहेत. रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना आगीच्या धुराचा त्रास होत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या सहाय्याने इमारतीबाहेर काढले आहे. 10 रुग्णांना कूपर रुग्णालय, 3 रुग्णांना ट्रॉमा आणि 15 रुग्णांना सेव्हन हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: mumbai fire at kamgar hospital in andheri midc and two killed