
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात काम करणाऱ्या चार ट्रॅक मेंटेनरचा रेल्वेच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण भुसावळ विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Mumbai News : चार ट्रॅक मेंटेनरचा मृत्यूनंतर कामगार संघटना आक्रमक!
मुंबई - मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात काम करणाऱ्या चार ट्रॅक मेंटेनरचा रेल्वेच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण भुसावळ विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर रेल्वे कामगार संघटना आक्रमक झाल्या असून असे अपघात टाळण्यासाठी सुरक्षेचा उपाययोजना करण्याची मागणी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन केली आहेत.
या घटनेनंतर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे जनरल सेक्रेटरी वेणू पी नायर यांनी सांगितले की, भुसावळ विभागातील लासलगाव विभागातील चार ट्रॅक मेंटेनर्सना कर्तव्य बजावत असताना रेल्वेगाडीची धडक लागून आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या अपघाती मृत्यूबद्दल महाव्यवस्थापकांची भेट घेतली. चार वर्षांपूर्वी दीपावलीच्या दिवशी कल्याणमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यानंतर अशा वारंवार घटना घडत असून ते महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच मृत कर्मचारी हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असून अनाथ मुलांबद्दल माहिती दिली. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अनुकंपा तत्वावर पात्र कुटुंबातील सदस्यांच्या जलद नियुक्ती देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय अपघात टाळण्यासाठी सुरक्षेचा उपाययोजना करण्याची मागणी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन केली आहे.
अशी घडली घटना
सोमवारी सकाळी टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. किमी 230 व पोल नंबर 15 ते 17 मधील ट्रॅक मेंटन करण्याचे काम सुरू होते. सदर काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत असतांना त्यांना रेल्वे लाईनची मेंटनेस करणारे टॅावरने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात जबर मार लागण्याने चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. संतोष भाऊराव केदारे वय 38 वर्षे, दिनेश सहादु दराडे वय 35 वर्षे, कृष्णा आत्मराम अहिरे वय 40 वर्षे आणि संतोष सुखदेव शिरसाठ वय 38 वर्षे असे चार मृत्यूपावलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.