मुंबई : कचरापेटीचा ‘बेळगाव पॅटर्न’

मुंबईत सध्या ६५०० ते ६८०० मेट्रिक टन कचरा रोज जमा होतो. त्यातील १०० टक्के कचरा उचलला जातो, असा दावा महापालिकेकडून केला जात आहे.
Garbage
Garbagesakal

मुंबई : मुंबईत लहान लहान बंदिस्त प्लास्टिकच्या कचरापेट्या ठेवल्या जातात. या कचरापेट्या भरल्यानंतर कचरा आजूबाजूला पसरतो. कचरा उघड्यावर पडल्यामुळे उंदीर, घूस अशा उपद्रवी प्राण्यांचा त्रास वाढतो. तसेच, भटक्या कुत्र्यांचाही त्रास होतो.

मुंबईत सध्या ६५०० ते ६८०० मेट्रिक टन कचरा रोज जमा होतो. त्यातील १०० टक्के कचरा उचलला जातो, असा दावा महापालिकेकडून केला जात आहे. कचरा उचलणाऱ्या वाहनांच्या रोज १६०० हून अधिक फेऱ्या होतात; तर मुंबईत तब्बल ९४९ कम्युनिटी कलेक्‍शन पॉईंट आहेत, अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात नमुद आहे.

रस्त्यावरील उघड्या कचरापेट्यांमुळे संपूर्ण परिसरालाच कचरापेटीचे स्वरूप येते. त्यामुळे कचरापेटीचा बेळगाव पॅटर्न राबवण्यात यावा, अशी सूचना भाजपच्या नगरसेवक स्वप्ना म्हात्रे यांनी महासभेत मांडली. या महिन्याच्या कामकाजात ठरावाच्या सूचनेवर चर्चा होणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर हा ठराव प्रशासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.

काय आहे बेळगाव पॅटर्न?

बेळगाव येथील रस्त्यांवर एक टन क्षमतेच्या भूमिगत जलदाब पेट्या (हायड्रोलिक डस्टबीन) बसविण्यात आल्या आहेत. वरच्या बाजूला केवळ कचरा टाकण्यासाठी झाकण असते. हे झाकण उघडून कचरा टाकावा लागतो. त्यामुळे कचरा आजूबाजूला पसरत नाही तसेच दुर्गंधीही होत नाही. बेळगावातील भूमिगत कचऱ्याच्या पेट्या भरल्यावर त्यावरील सेन्सरमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर अलर्ट जातो. त्यामुळे तत्काळ कचरा उचलला न गेल्यास संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई होते.

Garbage
संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

पालिकेचे काय प्रयोग सुरू?

  • डम्पिंगवर येणारा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने रोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या संकुलांना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • कचरा जेथे निर्माण होतो त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्यास प्राधान्य देण्याचा प्रयोग अंधेरी पश्‍चिमला केला जात आहे.

  • महालक्ष्मी येथील कचरा हस्तांतरण केंद्रात कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रयोग करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com