Mumbai : राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध युवासेनेचे मांडा टिटवाळा येथे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार भाजपला एक विनंती आहे
shivsena
shivsenasakal

डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व शुभांशू त्रिवेदी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा मांडा टिटवाळा येथील शिवसेना युवासेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने राज्यपाल आमच्या उरावर आणून बसविले आहेत, उरावर बसविलेला हा कलंक दूर करण्याची जबाबदारी देखील तुमची असून तो दूर करावा अशी मागणी यावेळी युवासेनेचे सहसचिव वकिल जयेश वाणी यांनी केली.

मांडा टिटवाळा येथील गणपती मंदिर चौकात शिवसेना युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात सहन करणारा माणूस हा महाराष्ट्रद्रोही असला पाहीजे. किंबहुना त्यांचे समर्थन करणारे या राज्याचे गद्दार आहेत. आतापर्यंत उद्योग पळवत होते तोपर्यंत ठीक होते. मात्र आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा जर अपमान सहन केला जातो आणि असा अपमान करायची हिम्मत दाखवत असेल तर असा राज्यपाल राज्याला नको.

माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार भाजपला एक विनंती आहे की राज्यपाल तुम्ही आमच्या उरावर आणून बसवला. आता आमच्या उरावर बसवलेला हा कलंक दूर करण्याची जबाबदारी तुमची आहे. तोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे वकील वाणी यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com