गोविंदांच्या सुरक्षेसाठी 350 गिर्यारोहक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबई - मनोरा कोसळल्यावर गोविंदांना इजा होऊ नये यासाठी गिर्यारोहकांची मदत घेतली जाणार आहे. रत्नाकर कपिलेश्‍वर यांनी "बिले' पद्धतीने गोविंदांचे संरक्षण करण्यासाठी तब्बल 350 गिर्यारोहकांचे पथक तयार करण्याचे ठरवले आहे.

दोन-तीन वर्षांपासून या पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याला चांगले यश मिळत आहे. यंदा ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जावी, यासाठी दहीहंडी समन्वय समिती कपिलेश्‍वर यांची मदत घेत आहे. कपिलेश्‍वर यांनी "बिले' पद्धतीविषयी सीडी तयार केली आहे. अनेक आयोजकांना त्यांनी ती पाठवली आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा उतरवण्याबरोबरच त्यांना इजा होऊ नये यासाठी समन्वय समिती प्रयत्न करत आहे. प्रत्येक मोठ्या दहीहंडीच्या ठिकाणी दोन गिर्यारोहक गोविंदांच्या मदतीला असतील.

अशी आहे "बिले' पद्धत
वरच्या थरांतील गोविंदांना "बिले' पद्धतीचा आधार दिला जाईल. हंडीच्या आडव्या दोराला मनोरा रचण्याच्या ठिकाणी काही दोऱ्या बांधून खाली सोडल्या जातात. मनोरा कोसळल्यावर वरच्या थरातील गोविंदा या दोऱ्या पकडून लोंबकळत राहतात. नंतर त्यांना सुरक्षितपणे उतरवले जाते.

Web Title: mumbai govinda security by Mountaineer