मुंबईत रूग्णवाढीचा दर 1.25 वर; गेल्या 24 तासात 2267 नवीन कोरोना रुग्णांची भर

मिलिंद तांबे
Friday, 18 September 2020

मुंबईत रुग्णांचा आकडा आज ही दोन हजारच्या वर गेला  असून आज 2,267 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,80,542 झाली आहे.

मुंबई : मुंबईत रुग्णांचा आकडा आज ही दोन हजारच्या वर गेला  असून आज 2,267 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,80,542 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.28 टक्क्यांवरून कमी होऊन 1.25 वर खाली आला आहे. मुंबईत आज 52 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,372 वर पोचला आहे. मुंबईत आज 925 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा एक टक्क्याने कमी होऊन 76 टक्के इतका झाला  आहे.                                                

राज्य सरकारी कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थिती शिथिल करा; कर्मचारी मध्यवर्ती महासंघाची मागणी

मुंबईत आज नोंद झालेल्या 52 मृत्यूंपैकी 37 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 39 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 31 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षा खालील होते.  39 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 12 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                   
आज 925 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,37,664 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 56 दिवसांवर गेला आहे. तर 17 सप्टेंबर पर्यंत एकूण 9,77,722  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.25 वर स्थिर आहे. 

निकृष्ट दर्जाचे धान्य देणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा; मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबईत 585 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,665 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 20,751 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 2,294 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mumbai, the growth rate is 1.25