विकासाच्या नावाखाली मराठी माणसावर वरवंटा - राज ठाकरे

दीपा कदम - सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

मुंबई - ""मुंबईचा विकास हा इतरांच्या पथ्यावर पडणार असेल आणि इथल्या मराठी माणसावर मात्र वरवंटा फिरणार असेल, तर तो विकासच नको... आज ज्या भागातून मेट्रो जाणार आहे, त्या भागात उद्या घरांचे दर वाढतील आणि ती घरं मराठी माणूस घेऊ शकणार नाही. हा विकास मराठी माणसाच्या अंगावर वरंवटा फिरवणार असेल, तर कशाला पाहिजे ही मेट्रो... मी कधीच विकासाला विरोध केलेला नाही; पण त्यामागचा छुपा "अजेंडा' खूप धोकादायक आहे. परप्रांतीयांचे मतदारसंघ तयार होणे, ही मुंबई तोडण्याच्याच दिशेने वाटचाल आहे,'' अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुंबई - ""मुंबईचा विकास हा इतरांच्या पथ्यावर पडणार असेल आणि इथल्या मराठी माणसावर मात्र वरवंटा फिरणार असेल, तर तो विकासच नको... आज ज्या भागातून मेट्रो जाणार आहे, त्या भागात उद्या घरांचे दर वाढतील आणि ती घरं मराठी माणूस घेऊ शकणार नाही. हा विकास मराठी माणसाच्या अंगावर वरंवटा फिरवणार असेल, तर कशाला पाहिजे ही मेट्रो... मी कधीच विकासाला विरोध केलेला नाही; पण त्यामागचा छुपा "अजेंडा' खूप धोकादायक आहे. परप्रांतीयांचे मतदारसंघ तयार होणे, ही मुंबई तोडण्याच्याच दिशेने वाटचाल आहे,'' अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. "मराठी कार्ड'वरच मनसे यापुढेही राजकारण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांनी "सकाळ'शी बोलताना विकास, परप्रांतीयांचे लोंढे आणि सत्ता याविषयी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ""विकास हा इथल्या माणसासाठी झाला पाहिजे यावर मी ठाम आहे. तमिळनाडूमध्ये देखील विकास होतोय; पण तो तिथल्या माणसांसाठी होतोय. इतर राज्यांमधला विकास हा त्यांच्या भाषेत, त्यांच्या माणसांसाठी होतोय. इतर राज्यांचा दुस्वास मला करायचा नाही; पण माझ्या राज्यातल्या मुलांना इथे नोकऱ्या मिळायला पाहिजेत, ही माझी मागणी आहे.'' 

मुंबईच्या विकासाविषयी कल्पना विशद करताना ते म्हणाले, ""ब्रिटिशांनी ज्याप्रकारे मुंबईचा विकास केला, त्याप्रकारे मुंबई शहराच्या नियोजनाचा विचार होण्याची आवश्‍यकता आहे. ब्रिटिशांनी कुलाबा ते माहिम कॉजवेपर्यंतचे नियोजन केले होत. ज्या वेळी मुंबईची लोकसंख्याही फार नव्हती, तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस उभारलेय जे आजही आपल्याला पुरतेय.'' 

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला खिंडार पडले. त्याबाबत राज म्हणाले, ""ज्यांना या विकासाशी देणेघेणे नव्हते ते गेले; पण मला नाशिकमधल्या अनंत कान्हेरे मैदानातल्या सभेला माणसं भाड्याने आणावी लागली नाहीत.'' 

भाजपच्या निवडणूक प्रचाराची धुरा वाहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टिप्पणी करताना राज ठाकरे यांनी, नोटाबंदीनंतर फक्‍त भाजपकडे पैसा आहे. निवडणुका पैशांच्या जिवावर हे खेळणार, आम्ही मात्र खेळायच्या नाहीत. भाजपकडे प्रचारासाठी काही मुद्दाच नव्हता. नाशिकमध्ये 88 गुंड निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी सर्वाधिक भाजपकडे होते. हीच का ती "पार्टी विथ डिफरन्स', असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 

Web Title: Mumbai hanging agenda