मुंबईत दगडखाण वसाहतींना पुरते धुवून काढले...

Mumbai Rain
Mumbai Rain

मुंबईः नवी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने तुर्भे परिसरातील दगडखाण वसाहतींना पुरते धुवून काढले. पावसाच्या जलप्रलयाने तुर्भे एमआयडीसी मधील बोनसरी गाव व ओमकार शेठ, पेंटर शेठ क्वारी येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने पालिका आयुक्त डॉ एन रामस्वामी यांनी आज मंगळवारी (ता. 9) सदरील परिसराची पाहणी केली. तसेच पूरग्रस्त परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्या महावीर दगडखाण मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आपत्कालीन व्यवस्थेला देण्यात आले.

बोनसरी व इंदिरा नगर येथील नाल्यात पावसाच्या प्रवाहा सोबत मोठे दगड व डेब्रिज वाहून आले आहेत. ही घाण येथील मुख्य नाल्यात अडकून राहिली असून याशिवाय येथील दगडखाण मालकांनी नाले बुजविल्या मुळे आज ही पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याचा फटका येथील झोपडपट्टी वस्तीला बसल्याने अनेकांचे संसार पाण्याने वाहून तर गेलेच पण अनेकांचे डोक्यावरचे छप्पर ही पाण्यात वाहून गेले .त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. पेंटर शेठ व ओमकार शेठ क्वारी येथील तर चार घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली तर 15 ते 20 घरांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान ही झाले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दगड खाणी बंद आहेत.त्यामुळे तेथील दगड व इतर डेब्रिज नाल्यात जमा होत आले आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. यावेळी बोनसरी व ओमकार व पेंटर क्वारी येथील रहिवासी यांनि आयुक्तांना आपले गाऱ्हाणे मांडले .मनपा प्रशासनाने त्यांना आर्थिक मदतीचा हात ही देऊ केला आहे .

मनपा प्रशासनाने बोनसरी नाल्यात संरक्षण भिंतीच्या आत दगडांचा भराव टाकून 10 ते 15 फूट बांधकाम केले आहे त्यामुळे ही नाल्याचा आकार निमुळता होत गेला आहे. त्यामुळे मनपाने आधी नाल्यातील अतिक्रमण हटवावे अशी मागणी नालंदा बुद्ध विहारा कडून आयुक्तांना लेखी पत्रातून करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com