तुम्हाला मानवतेबद्दल प्रेम असेल तर प्रार्थनास्थळे खुली करण्याची मागणी करु नका - हायकोर्ट

तुम्हाला मानवतेबद्दल प्रेम असेल तर प्रार्थनास्थळे खुली करण्याची मागणी करु नका - हायकोर्ट

मुंबई : सध्याची परिस्थिती प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी पूरक नाहीत, असे मत आज मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. मानवतेच्या प्रेम आणि सुरक्षेसाठी घरामध्येच प्रार्थना करा, प्रार्थनास्थळे खुली करण्याची मागणी करु नका, असा सल्लाही न्यायालयाने याचिकादाराला दिला आहे.

राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करा आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मर्यादित संख्येने प्रवेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका ऍड. दिपेश सिरोया यांनी केली आहे. याचिकेवर आज मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. तावडे यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. राज्य सरकार प्रार्थनास्थळे खुली करु शकतात, असा दावा याचिकादाराने केला होता.

मात्र खंडपीठाने हा दावा अमान्य केला. तुमच्या मते सर्वात मोठे मंदिर कोणते आहे, असा प्रश्‍न न्यायालयाने याचिकादाराला विचारला. यावर, सर्वात मोठे मंदिर मानवतेचे आहे, असे उत्तर सिरोया यांनी दिले. जर तुम्हाला मानवतेबद्दल प्रेम असेल तर तुम्ही प्रार्थनास्थळे खुली करण्याची मागणी करु नका. घरी राहून मानवतेच्या प्रेमा आणि सुरक्षेसाठी प्रार्थना करा, असा सल्ला खंडपीठाने दिला. सध्याची राज्यातील परिस्थिती अद्यापी सुधारलेली नाही, त्यामुळे लोकांनी घरी राहूनच प्रार्थना करावी, असेही खंडपीठ म्हणाले.

अन्य एका प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयात यासंबंधी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, असे राज्य सरकारच्या वतीने सांगणअयात आले. कोरोना साथीचा संसर्ग वाढतो आहे, अशा परिस्थितीत प्रार्थनास्थळे खुली करण्यामुळे धोका अधिक वाढू शकतो. गुढी पाडवा आणि दहीहंडीच्या सार्वजनिक उत्सवालाही सरकारने मनाई केली होती, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

न्यायदेवतेचे मंदिरही खुले होईल

अन्य राज्यांमध्ये प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली आहेत आणि राज्यातील परिस्थिती देखील सुधारत आहे, असा दावा सिरोया यांनी केला. मात्र राज्यातील परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही, असे खंडपीठ म्हणाले. जर राज्यातील परिस्थिती सुधारली तर सर्वात आधी न्यायदेवतेचे मंदिर लोकांसाठी खुले होईल, पण सध्या परिस्थिती पूरक नाही, त्यामुळे लोकांनी घरीच प्रार्थना करावी, असे खंडपीठ म्हणाले. 

mumbai high court dismissed petition filed to opened religious places in maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com