Vidhan Sabha 2019 : विद्या ठाकूरांना उच्च न्यायालयाचा दणका!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

आठवड्यातून दोन दिवस सकाळी आणि संध्याकाळी भरमसाठ फी घेऊन क्रिकेट कोचिंग क्लास घेण्यास सुरुवात केली आणि त्या वेळात इतरांना मैदानावर प्रवेश बंद करण्यात आला होता.

गोरेगाव : ‘क्रिकेट कोचिंग’च्या नावाखाली बळकावण्यात आलेलं गोरेगावातील सार्वजनिक मैदान ताबडतोब खुलं करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेत्या विद्या ठाकूर यांच्या ‘व्हिनस स्पोर्टस्‌ अकादमी’ला दिला आहे.

न्यायालयाच्या या दणक्यामुळे प्रेमनगरमधील रस्तुमजी टॉवर्स शेजारचं हे मैदान आता ‘व्हिनस क्रिकेट ग्राउंड’ न राहता सगळ्या गोरेगावकरांसाठी खुलं होणार आहे. ‘व्हिनस’ विरोधात सचिन चव्हाण यांनी गोरेगावकरांच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

- Vidhan Sabha 2019 : पावसामुळे मतदानाचा टक्का घसरणार?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘व्हिनस कल्चरल असोसिएशन’ला हे खुलं मैदान दत्तक दिलं होतं. त्या करारानुसार ते मनोरंजनासाठी वापरायचं होतं. मात्र, ‘व्हिनस स्पोर्टस्‌ क्रिकेट अकादमी’तर्फे ते बळकावत मैदानातली क्रिकेटची खेळपट्टी वापरण्यास सुरुवात केली. आठवड्यातून दोन दिवस सकाळी आणि संध्याकाळी भरमसाठ फी घेऊन क्रिकेट कोचिंग क्लास घेण्यास सुरुवात केली आणि त्या वेळात इतरांना मैदानावर प्रवेश बंद करण्यात आला होता. स्थानिक रहिवासी, लहान मुलांना तिथे खेळणे अवघड झाले होते.

- Vidhan Sabha 2019 : 'रोहितच्या वयाचा असताना लढलो, आता यांचा 'राम'ही शिल्लक राहणार नाही

या विरोधातल्या जनहित याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने या मैदानावर विशिष्ट वेळ विशिष्ट अॅक्टिव्हिटीसाठी राखून ठेवता येणार नाही, कोणत्याही स्पोर्टस्‌ अकादमीला असं करता येणार नाही, असं ठणकावून सांगत हे मैदान ‘सार्वजनिक उद्यान’ म्हणूनच वापरलं गेलं पाहिजे, असा आदेश दिला आहे.

- Vidhan Sabha 2019 : 'पाडा रे...' गाण्याची सोशल मीडियावर धूम!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai High Court orders BJP candidate Vidya Thakur to vacate ground in Goregaon