रतन टाटा यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

टाटा समुहाचे तत्कालीन प्रमुख सायरस मिस्त्री यांना पदउतार करताना टाटा यांनी वादग्रस्त विधाने केली होती.

मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अन्य संचालक मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाने आज (ता. 22) दिलासा दिला. उद्योगपती नस्ली वाडिया यांनी डिसेंबर 2016 मध्ये दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या अब्रु नुकसानीच्या दाव्याची फौजदारी कारवाई उच्च न्यायालयाने रद्द केली.

टाटा समुहाचे तत्कालीन प्रमुख सायरस मिस्त्री यांना पदउतार करताना टाटा यांनी वादग्रस्त विधाने केली होती. ज्यामुळे माझी बदनामी झाली, असा आरोप वाडिया यांनी दंडाधिकारी न्यायालयात केला होता. याविरोधात टाटा यांनी हायकोर्टमध्ये याचिका केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai High court s relief to Ratan Tata