मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार, मल्टिप्लेक्स असोसिएशनला फटकारले

वृत्तसंस्था
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सुरक्षेचा मुद्दा उचलून राज्य सरकारने या बंदीला समर्थन करत तसे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केले होते व याचिका निकाली काढण्याची मागणी केली होती. त्यावरील सुनावणीच्या दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मल्टिप्लेक्स असोसिएशनला सुनावले. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ नेल्यास धोका निर्माण होत नाही का असे विचारत फटकारले.

मुंबई : मल्टीप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्यासंबंधित घातलेल्या बंदीबाबत आज (ता. 8) मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मल्टिप्लेक्स असोसिएशनला फटकारले आहे. सिनेमा दाखवणे हे तुमचे काम आहे, पदार्थ विकणे नाही असे म्हणत उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला फटकारले, तर सार्वजनिक ठिकाणीही नागरिक घरचे पदार्थ घेऊन जातात, तेव्हा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत नाही का असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे.   

सुरक्षेचा मुद्दा उचलून राज्य सरकारने या बंदीला समर्थन करत तसे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केले होते व याचिका निकाली काढण्याची मागणी केली होती. त्यावरील सुनावणीच्या दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मल्टिप्लेक्स असोसिएशनला सुनावले. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ नेल्यास धोका निर्माण होत नाही का असे विचारत फटकारले. 

या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनावरही नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत कोणीही कायदा हातात घेऊ नये, असेही उच्च न्यायालयाने सांगितले. यासंदर्भातील पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होईल.

Web Title: mumbai high court slams state government and multiplex association on outside food issue