मुंबईला सप्टेंबर हिटचा तडखा; आजारात वाढ होण्याची शक्‍यता 

समीर सुर्वे
Sunday, 6 September 2020

ऑगस्ट महिन्यात तुफान बरसणाऱ्या पावसाने आता पाठ फिरवल्याने मुंबईकरांना सप्टेंबर हिटचा दाह सहन करावा लागत आहे.

मुंबई : ऑगस्ट महिन्यात तुफान बरसणाऱ्या पावसाने आता पाठ फिरवल्याने मुंबईकरांना सप्टेंबर हिटचा दाह सहन करावा लागत आहे. सोमवारपर्यंत हे तापमान कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजारातही वाढ होण्याची शक्‍यता आहे. मुंबईत आज कुलाबा येथे कमाल 33.2 अंश; तर सांताक्रूझ येथे किमान 33.6 अंश तापमानाची नोंद झाली. 

अरे बापरे! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

शुक्रवारपासून मुंबईत प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे. शनिवारी सकाळीही नागरिकांना उन्हाचे चटके बसले. संध्याकाळपर्यंत उन्हाचा दाह जाणवत होता. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने बेस्ट बससाठी रांगा वाढल्या आहेत; तर रस्त्यावरही वाहतूक वाढल्याने कोंडी होत आहे. त्यामुळे या उन्हाचा प्रचंड मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागला. पाऊस पडत नसला, तरी घामाच्या धारा दिवसभर वाहत होत्या. 

सुशांतसिंग राजपुतचा नोकर दिपेश सावंतला एनसीबीकडून अटक

गेल्या चार-पाच दिवसांत कमी पाऊस, दिवसभर ऊन, संध्याकाळी ढगाळ आकाश किंवा गडगडाटासह पाऊस पडत आहे. त्याचा एकत्रित परिणाम वातावरणात जाणवत आहे. वातावरणातील या अचानक बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पुढचे काही दिवस असेच वातावरण राहण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. 

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai hit by September hit; Possibility of increase in disease