...आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

मुंबई - मुंबईतील जगप्रसिद्ध इमारत छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मुंबई छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव आता बदलण्यात येणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.

दोन्ही नावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा बदल करण्यात येणार आहे.

या दोनही नावांमध्ये छत्रपती शिवरायांसाठी आदरार्थी वापरला जाणाऱ्या महाराज या शब्दाचा उल्लेख नव्हता. यामुळे दोन्ही नावांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आणि मुंबईची ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या वास्तूचे रूप नजर लागण्यासारखे आहे. मध्य रेल्वेच्या विविध कार्यालयांचा भार सध्या या वास्तूमध्ये आहे. वास्तूची उभारणी 1878 मध्ये सुरू झाली. फेड्रिक विल्यम स्टीव्हन्स्‌ या वास्तुविशारदाने या भव्य इमारतीची आखणी केली. व्हिक्‍टोरियन गॉथिक शैलीतील इमारतीचा प्रत्येक कोपरा अन्‌ कोपरा हा कलाविष्काराचा उत्तम नमुना आहे. 

Web Title: Mumbai International Airport and Chhatrapati Shivaji Terminus to be renamed soon