Airport : विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर! मुंबईत विमानतळ रनवे जवळील भिंत कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airport Security Wall Collapse

जरीमरी येथील मुंबई विमानतळ रनवे जवळील भिंत कोसळली असून अद्यापही कोणत्याही प्रकारचे काम सुरु झाले नसून फक्त पत्र्याने परिसर बंदिस्त केला आहे.

Airport : विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर! मुंबईत विमानतळ रनवे जवळील भिंत कोसळली

मुंबई - जरीमरी येथील मुंबई विमानतळ रनवे जवळील भिंत कोसळली असून अद्यापही कोणत्याही प्रकारचे काम सुरु झाले नसून फक्त पत्र्याने परिसर बंदिस्त केला आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी 6.40 वाजता घडली. विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर असून प्रशासन धिम्म गतीने काम करत आहे.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी आता स्थानिकांकडून केली आहे. कुर्ला अंधेरी मार्गावरील जरीमरी कब्रस्तान समोर भिंत कोसळली असून रनवे लागूनच आहे. याठिकाणी पालिकेचे काम सुरु असून जेसीबीमुळे भिंत कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानतळ प्रशासनाने ज्या तीव्रतेने कारवाई करणे गरजेचे आहे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. या पत्रकात विमानतळ प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाची माहिती दिली आहे. या घटनेनंतर विमानतळ प्रशासनाच्या वतीने विमानतळ सुरक्षा विभाग आणि सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स सीआयएसएफ यांना तात्काळ माहिती देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, त्या ठिकाणी अतिरिक्त रक्षक तैनात करण्यात आले आहे.

बाधित क्षेत्राला सुरक्षित करण्यासाठी बॅरिकेड्स त्वरीत लावण्यात आले आहे. या घटनेमुळे विमानतळाच्या कामकाजात किंवा सेवांमध्ये कोणताही व्यत्यय आला नाही. तसेच कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. विमानतळाच्या सुरक्षितता आणि सुरक्षेची सर्वोच्च मानके राखत आहे आणि घटनेच्या तपासासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहे.

टॅग्स :MumbaiSecuritywallAirport