
Mumbai : कल्याण ग्रामीण परिसरात कुस्तीची दंगल
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील उत्तरशिव-गोठेघर येथील मैदानात कुस्त्यांचे जंगी सामने भरवण्यात आले होते. हे सामने पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. उत्तरशिव-गोठेघर येथील स्व.आनंद दिघे मैदानात कुस्त्यांचे जंगी सामने भरवण्यात आले होते.
हे सामने पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.या कुस्तीच्या सामन्यात लहान मुले-मुली तसेच मोठ्या मल्लानी भाग घेतला होता.कुस्तीचे आयोजन जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील यांनी केले असून हे सामने पाहण्यासाठी माजी आमदार सुभाष भोईर आवर्जून उपस्थिती लावली होती.
जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील यांनी सांगितले की गेले 23 वर्ष या मैदानात आम्ही क्रिकेट सामने भरत होतो, मात्र यावेळी कुस्तीचे सामने भरवले आहेत.या माती मधील खेळाडूंना प्रोचाहन देण्यासाठी हे आम्ही आयोजन केले होते. भिवंडी, कल्याण, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मलंगगड, अंबरनाथ, कर्जत, पनवेल या परिसरातून 400 मल्लानी यात भाग घेतला आणि 200 सामाने येथे भरवण्यात आले होते.