कल्याण पूर्वमध्ये स्वागत यात्रेत सामाजिक संदेश देणारे चलचित्ररथ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

आज रविवारी (ता. 18 मार्च) ला कल्याण पूर्व मधील गणपती मंदिर चौक येथे नववर्ष स्वागत यात्रा समिती अध्यक्ष आणि आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते गुढी पूजन करण्यात आली.

कल्याण - कल्याण पूर्व मध्ये हिन्दू नव वर्ष स्वागत यात्रा समिती च्या वतीने नव वर्ष स्वागत यात्रा दरवर्षी प्रमाणे आज रविवारी (ता. 18 मार्च) ला काढण्यात आली होती. यात एकोपा आणि सामाजिक संदेश देणारे चलचित्र लक्ष वेधून घेणारे होते. तर 58 हून अधिक सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता.

आज रविवारी (ता. 18 मार्च) ला कल्याण पूर्व मधील गणपती मंदिर चौक येथे नववर्ष स्वागत यात्रा समिती अध्यक्ष आणि आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते गुढी पूजन करण्यात आली. तदनंतर स्वागत यात्रेला सुरवात झाली, गणपती मंदिर चौक, जूना जनता सहकारी बँक, मार्गे म्हसोबा चौक, तिसगाव रोड, व्हाया तिसगाव नाका मार्गे स्वागत यात्रा काढण्यात आली. तर समारोप तिसाई देवी मंदिर परिसर मध्ये समारोप झाला तब्बल 3 तासाहून अधिक काळ यात्रा सुरु होती. चौकाचौकात 10 ते 15 हून अधिक ठिकाणी गुढी उभारण्यात आल्या होत्या. त्यांचे पूजन आमदार गणपत गायकवाड आणि मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. या यात्रेत 58 हून अधिक सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, संस्था सहभागी झाल्या होत्या. चित्ररथ, शाळेच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, भजनी मंडळ, भगवे फेटे धारी महिला, युवक, जेष्ठ नागरिक, राजकीय नेते यात सहभाग घेतला. चित्ररथ मध्ये सामाजिक संदेश देणारे होते. शेतकरी आत्महत्या समस्या, पर्यावरण, प्लॅस्टीक मुक्ती, कोकणातील पर्यटनाच्या विषयावर कोकण उत्कर्ष मंडळाचा चलचित्र, महिला सुरक्षा, स्री भ्रूण हत्या, हुंडा बळी, चायना वस्तू वापरु नका स्वदेशी वस्तूचा वापर करा. बेटी बचाओ, बेटी पढाओ, एसटी बसमुळे आज आपण कोकणात काय पाहू शकतो आदी विषयाचे चलचित्र रथ देखावे नागरिकांची नजर खिळवून ठेवत होते. नरेंद्र महाराज संप्रदायाचे हजारो पुरुष महिला पारंपरिक वेषात होते. चौकाचौकात स्वागत यात्रेचे स्वागत करण्यात आले. अनेकांनी पानी, सरबत, आइसक्रीमची व्यवस्था केली होती. 

स्वागत यात्रा मध्ये सहभागी झालेल्या नागरिकाना पानी आणि खाऊ वाटप करण्यात आला, तो कचरा रस्त्यावर पडला होता, त्याचा त्रास होवू नये म्हणून कल्याण पूर्व मधील सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले यांच्या सहयोग सामाजिक संस्थेने तो कचरा साफ केला. यामुळे काही तासात स्वच्छ्ता दिसून आली. तर प्लॅस्टीक मुक्तीचा नारा देत एक हजाराहून कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. 

तिसाई देवीच्या मंदिर जवळ झालेल्या कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड आणि मान्यवरांच्या हस्ते स्वागत यात्रेत सहभागी झालेल्या संस्था, शाळा, चित्र रथ, भजनी मंडळ, देणगीदराचा प्रशस्ती पत्रक आणि सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार गणपत गायकवाड, विष्णु जाधव, मनोज राय, संजय गायकवाड अभिमन्यू गायकवाड, संजय मोरे, नाना सुर्यवंशी, परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के, संदीप तांबे, वसंत सूर्यवंशी, विष्णु गायकवाड, रवि हराळे, उमाकांत चौधरी, विजय भोसले, राजू अंकुश, वंदना मोरे, रुपेश गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते .

Web Title: mumbai kalyan welcome yatra message chalachitrarath