esakal | मुंबई : कांदळवनावर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर
sakal

बोलून बातमी शोधा

kandalvan

मुंबई : कांदळवनावर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी आता सीसीटीव्ही यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या बैठकीत याबाबतची घोषणा करण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात कांदळवनांच्या १०६ संवेदनशील ठिकाणी एकूण २७९ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. त्यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम व मध्य मुंबई व तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व ठाणे खाडी फ्लेमिंगो खाडीतील अभयारण्याचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: मोदी सरकारकडून किरिट सोमय्यांना झेड सुरक्षा

कांदळवने वाचवण्यासाठी जनजागृती करावी; तसेच सागरतटीय भागात कांदळवन वृक्षाची लागवड करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी दिल्या. कांदळवन प्रतिष्ठानमार्फत विकसित करण्यात येत असलेले निसर्ग क्षेत्रे, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य आणि इतर उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पर्यटनाला चालना द्यावी, असेही ते या वेळी म्हणाले.

वडाळ्यात संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र

एमएमआरडीएने कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून वडाळ्याच्या भक्ती पार्क येथे कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

loading image
go to top