Viral Video: 22 व्या मजल्यावरुन स्टंट करणारा तरुण अटकेत

पूजा विचारे
Friday, 16 October 2020

व्हायरल व्हिडिओत एक तरुण स्टंट करताना दिसत आहे. या तरूणाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नोमाण डिसूजा असे या तरूणाचे नाव आहे.सोशल मीडियावर या तरूणाचा स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

मुंबईः आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले आहेत. त्यातच बऱ्याचदा आपण स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहिले असतील. आता असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हा व्हायरल व्हिडिओ मुंबईतला आहे. या व्हायरल व्हिडिओत एक तरुण स्टंट करताना दिसत आहे. या तरूणाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नोमाण डिसूजा असे या तरूणाचे नाव आहे.

सोशल मीडियावर या तरूणाचा स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर  जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरूणाला शोधण्यात मुंबई पोलिसांना यश आले. गुरूवारी रात्री पोलिसांनी या तरूणाला अटक केली. हा तरूण सध्या शिकत असून त्याला स्टंट करण्याची आवड आहे. ११ ऑक्टोबरला हा व्हिडिओ शूट केला होता. या तरुणाविरोधात पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबईतल्या एका उंच इमारतीच्या कठड्यावरुन या तरुणानं जीवघेणा स्टंट केला होता. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हा तरुण इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन कठड्यावर बसला आहे. त्यानंतर तो एनर्जी ड्रिंक पितो आणि इमारतीच्या स्लॅबवर उडी मारतो. स्लॅबवर उभा राहून तो हॅण्डस्टँड करताना दिसत आहे. तो तरुण हा स्ंटट करत असताना त्याचे दोन मित्र मोबाईलमध्ये हा सर्व स्टंट शूट करत आहे. त्यातील एक मित्र हा स्टंट शूट करण्यासाठी स्लॅबवर उतरलेला दिसत आहे. 

Mumbai kandivali viral Video Noman D'Souza stunt young boy arrested


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai kandivali viral Video Noman D'Souza stunt young boy arrested