Viral Video: कठड्यावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून शोध सुरु

पूजा विचारे
Thursday, 15 October 2020

एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडिओ मुंबईतला असल्याचं समजतंय. या व्हायरल व्हिडिओत एक तरुण स्टंट करताना दिसत आहे. 

मुंबईः आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले आहेत. त्यातच बऱ्याचदा आपण स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहिले असतील. आता असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडिओ मुंबईतला असल्याचं समजतंय. या व्हायरल व्हिडिओत एक तरुण स्टंट करताना दिसत आहे. 

मुंबईतल्या एका उंच इमारतीच्या कठड्यावरुन हा तरुण जीवघेणा स्टंट करत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हा तरुण इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन कठड्यावर बसला आहे. त्यानंतर तो एनर्जी ड्रिंक पितो आणि इमारतीच्या स्लॅबवर उडी मारतो. स्लॅबवर उभा राहून तो हॅण्डस्टँड करताना दिसत आहे. तो तरुण हा स्ंटट करत असताना त्याचे दोन मित्र मोबाईलमध्ये हा सर्व स्टंट शूट करत आहे. त्यातील एक मित्र हा स्टंट शूट करण्यासाठी स्लॅबवर उतरलेला दिसत आहे.

बुधवारपासून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओची दखल मुंबई पोलिसांनीही घेतली आहे. पोलिस सध्या या तरुणाचा शोध घेत आहेत. तर तरुणासोबत स्टंट आपल्या मोबाईलमध्ये शूट करणाऱ्या दोन्ही मित्रांचाही पोलिस शोध घेताहेत. 

मुंबईतल्या लेटेस्ट बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान कांदिवली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रवी अदाने यांनी ज्या इमारतीवर हा स्टंट करण्यात आला त्या इमारतीची ओळख पटली असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. जय भारत असं इमारतीचं नाव आहे. व्हायरल व्हिडिओत असलेल्या तरुणांचीही ओळख पटली असून सध्या ते तरुण बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या बेपत्ता तरुणाचा पोलिस शोध घेताहेत.

Mumbai kandivali viral Video of a young man stunt building goes viral police search


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai kandivali viral Video of a young man stunt building goes viral police search