मुंबई : सेलिब्रिटी, तरी आरोपीच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 kangana ranaut

मुंबई : सेलिब्रिटी, तरी आरोपीच!

मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मानहानीच्या एका खटल्यात खडे बोल सुनावले आहेत. कंगना जरी सेलिब्रिटी असली, तरी या प्रकरणात ती आरोपी आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. खटल्याच्या सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मागणी करणारा अर्ज कंगनाच्या वतीने करण्यात आला होता. दंडाधिकारी आर. आर. खान यांनी तो नामंजूर केला होता. त्याबाबतचे सविस्तर निकाल-पत्र आज उपलब्ध झाले आहे. सुनावणीसाठी गैरहजर राहणे कंगनाचा अधिकार नाही. जामिनाच्या शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे, असे खडे बोल न्यायालयाने तिला सुनावले.

Web Title: Mumbai Kangana Ranaut Celebrity Accused

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..