मुंबईतल्या कराची स्वीट्सला मनसेचा 'दे धक्का', थेट कायदेशीर नोटीस

पूजा विचारे
Thursday, 19 November 2020

मनसेनं मुंबईत मराठी पाट्या आणि पाकिस्तान कलाकारांविरोधात आंदोलनं पुकारलं होतं. याच पार्श्वभूमीवर कराची स्वीट्स नावानं मिठाईची दुकानं चालवणाऱ्यांना मनसेनं थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 

मुंबईः मुंबईत कराची स्वीट्स नावानं मिठाईचे दुकानं आहेत. ही दुकानं चालवणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दणका दिला आहे. मनसेनं मुंबईत मराठी पाट्या आणि पाकिस्तान कलाकारांविरोधात आंदोलनं पुकारलं होतं. याच पार्श्वभूमीवर कराची स्वीट्स नावानं मिठाईची दुकानं चालवणाऱ्यांना मनसेनं थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 

मनसेचे राज्य उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी या दुकान चालकाला थेट न्यायालयात खेचणार आहे. त्याबाबत शेख यांनी कराची स्वीट्स व्यवस्थापकांना नोटीसही पाठवली आहे. या नोटीशीचे फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवरही शेअर केलेत.

देशाचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानची राजधानी कराची या नावाने बहुचर्चित कराची स्वीट्स या नावाचा आधार घेऊन मिठाईचे दुकान सुरू केले आहे. त्यामुळे भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेचू पोहोचून हा व्यवसाय केला जात असल्याचा आक्षेप हाजी सैफ शेख यांनी घेतला आहे.

हाजी सैफ शेख यांना या प्रकाराबद्दल समजताच त्यांनी कराची व्यवस्थापनाला एक पत्र लिहून तात्काळ नाव हटवण्याची मागणी केली. त्याचसोबत हैदराबाद येथील कराची स्वीट्स व्यवस्थापकांना एक कायदेशीर नोटीस दिली आहे.

अधिक वाचा-  विरार ATM लूट प्रकरणः सव्वा चार कोटी लंपास करणारे चोरटे अखेर ताब्यात

वीज बिलासाठी मनसेकडून आंदोलनाचा इशारा

लॉकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना आलेल्या भरमसाठी वीज बिलात सवलत देण्यास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नकार दिला. त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली.  याच पार्श्वभूमीवर मनसे देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे. मनसेचे सरचिटणीस यांनी ट्विट करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. लाथो के भूत बातों से नही मानते, असं सूचक ट्विट त्यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यात आता वीज बिलाच्या मुद्द्यावरुन देशपांडे यांनी ट्विट केले असून या ट्विटमध्ये ठाकरे सरकारला थेट इशारा दिला आहे.  वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते, असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे.

Mumbai karachi sweets shop name mns Aggressive mns leader haji saif sheikh sends legal notice


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai karachi sweets shop name mns Aggressive mns leader haji saif sheikh sends legal notice