मध्य रेल्वेच्या 43 हिवाळी विशेष गाड्या

railway
railway

मुंबई, ता.20 : नाताळचा आनंद आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने 43 विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी, पनवेल ते करमळीदरम्यान या विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आणि पर्यटकांचा फायदा होणार आहे. 

लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी स्पेशल ट्रेनच्या 14 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. 01045 ट्रेन दर शुक्रवारी रात्री 1 वाजून 10 मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी करमळीला पोहचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी 01046 ट्रेन दर शुक्रवारी दुपारी 1 वाजता सुटून त्याच रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी एलटीटीला पोहचणार आहे. ही ट्रेन 22 नोव्हेंबर ते 3 जानेवारीदरम्यान चालविण्यात येणार आहे. 
01051 एलटीटी-करमळी ट्रेन दर शुक्रवारी (22 नोव्हेंबर ते 3 जानेवारी) रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी करमळीला पोहचणार आहे; तर परतीच्या प्रवासासाठी 01052 ट्रेन दर रविवारी (24 नोव्हेंबर ते 5 जानेवारी) दुपारी 1 वाजता सुटणार असुन रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी एलटीटीला पोहचणार आहे. या दोन्ही स्पेशल ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. 

याशिवाय 01015 पनवेल-करमळी स्पेशल ट्रेन दर रविवारी रात्री 12 वाजून 55 मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी करमालीला पोहचणार आहे. ही ट्रेन 23 नोव्हेंबर ते 5 जानेवारी दरम्यान सुटणार आहे. प्रवाशांना या स्पेशल ट्रेनचे आरक्षण आज (ता. 20) पासून करता येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com