Mumbai Crime : अल्पवयील मुलीकडून एका वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण; दोन तासात बालिकेची सुटका

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एका वर्षाचे बाळाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली.
Pune Crime News
Pune Crime Newssakal
Summary

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एका वर्षाचे बाळाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एका वर्षाचे बाळाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने अवघ्या दोन तासात एका वर्षाच्या बाळाचा शोध घेऊन अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,वरळी येथे राहणारी फरीदा अन्सारी (३०) २१ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता गावी जाण्यासाठी सीएसएमटी येथे आल्या. त्यानंतर पुष्पक एक्सप्रेस गाडी सकाळी असल्याचे समझले. त्यानंतर फरीदा घरी जाण्याऐवजी त्या सीएसएमटीच्या सर्वसामान्य विश्रांती गृहात थांबल्या. यादरम्यान फरीदा यांना झोप येत होती. तेव्हा त्यांनी आपल्या एका वर्षाच्या मुलीला घेऊन झोपी गेल्या. त्यानंतर मध्य रात्री ३.०५ वाजता फरीदा यांना झोपेतून जाग आली. त्यानंतर, बघितले तर त्यांचे बाळ नव्हते. घाबरलेल्या फरीदाने आपल्या बाळाच्या शोधात संपूर्ण सीएसएमटी स्थानक पिंजून काढले. परंतु, तिचे बाळ मिळाली नाही. त्यानंतर सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी दिली.

पोलिसांना यश -

लोहमार्ग पोलिसांनी स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही तपासले. बाळाचे फोटो परिसरातील सर्व पोलिसांना पाठवले.

आझाद मैदान पोलिसांनी या बाळाला चर्चगेट दिशेला जाताना पाहिल्याचे रेल्वे पोलिसांना कळविले. दरम्यान चर्चगेटमधील एम. के. रोडमधील एका वॉचमनने पदपथावर असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने धाव घेत त्या बाळा ताब्यात घेत फरिदा अन्सारी यांच्याकडे सुखरूप सोपवले.

आरोपीला अटक -

लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून सीएसएमटी येथे एक संशयित अल्पवयीन व्यक्ती दिसून आली. त्यानंतर सीएसएमटी, चर्चगेट, मस्जिद बंदर, दादर, कुर्ला, ठाणे व कल्याण रेल्वे स्थानक परिसरात व शहर हद्दीतील सीसीटिव्ही चित्रीकरण तपासले. सोमवारी सकाळी ६.३० वाजता संशयित अल्पवयीन व्यक्ती मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात फिरताना दिसून आली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सापळा रचून संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपी नालासोपारा येथे राहणारा असून अपहरण केल्याप्रकरणी ताब्यात करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com