
Mumbai : मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी; वॉक्हार्ट रुग्णालयात जागतिक किडनीदिनी रुग्णाला जीवदान
विरार - क्रॉनिक इंटरस्टिशियल नेफ्रायटिस या आजाराने पीडित असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीवर मीरा रोड येथील वॉक्हार्ट रुग्णालयात यशस्वीरित्या मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. वॉक्हार्ट रुग्णालयातील सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. पुनीत भुवानिया यांच्या नेतृत्वाखाली अन्य एका डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे. जागतिक किडनी दिनीच त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
अलॉयसियस असे या रुग्णाचे नाव असून तो क्रॉनिक इंटरस्टिशियल नेफ्रायटिस या आजाराने त्रस्त होता. मूत्रपिंडाशी संबंधित हा अतिशय गंभीर आजार आहे. चार वर्षांपासून ते डायलिसिसवर होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी किडनी प्रत्यारोपणासाठी मीरा रोडच्या वॉक्हार्ट रुग्णालयात प्रत्यारोपण प्रतीक्षा यादीमध्ये नोंदणी केली होती.
काय म्हणतो आजार?
क्रॉनिक किडनी रोग हा एक विकार आहे. ज्यामध्ये किडनी खराब होते. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ सामान्यपणे कार्य करत नाही. मुलांमध्ये, सीकेडी जन्मजात दोष, मूत्रमार्गात संक्रमण आणि आनुवंशिक आजारांमुळे होऊ शकतो. प्रौढांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत.
हा आजार गंभीर अवस्थेत जाईपर्यंत मुलांमध्ये सीकेडीची लक्षणे दिसू शकत नाहीत. लवकर ओळख आणि उपचार केल्याने किडनीचे अतिरिक्त नुकसान पूर्ववत करण्यात आणि रोखण्यात मदत होऊ शकते, असे वॉक्हार्ट रुग्णालयातील सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. पुनीत भुवानिया म्हणाले
शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. अत्याधुनिक प्रत्यारोपण आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. प्रशिक्षित कर्मचार्यांच्या देखरेखीखाली ते पूर्णपणे बरे होऊ शकले.
- डॉ. पुनीत भुवानिया, सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन