
Mumbai : 'वंचित'च्या पदाधिकाऱ्यावरील हल्ल्यासाठी मारेकऱ्यांना लाखोंची सुपारी; आरोपींची कबुली
मुंबई : दादर परीसरात वंचित बहुजन आघाडी पक्षाचा पदाधिकारी आणि एका कार्यकर्त्यावर झालेला चाकूहल्ला हा सूड बुद्धितून करण्यात आल्याचे पोलीस तपासत उघड झाले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपीनी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौरांच्या मुलाने हा हल्ला करण्यासाठी त्यांना सुपारी दिल्याची कबुली दिली आहे.
भोईवाडा पोलिसांनी आरोपी सिद्धांत गायकवाड याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश हातणकर, नाझीर सय्यद, साकिब कुरेशी आणि यादव या चार हल्लेखोरांना शुक्रवारी भायखळा परिसरात भोईवाडा पोलिसांनी अटक केली.
व्हीबीएचे युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि व्हीबीए सदस्य गौतम हराळ यांनी दोन महिन्यांपूर्वी चुनाभट्टी येथे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे जगदीश गायकवाड यांचा मुलगा सिद्धांत याला बदला घ्यायचा होता.
5 लाखांची सुपारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी जगदीशने बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती ज्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना राग आला आणि गायकवाड याना कथितपणे मारहाण केली. तसेच त्या मारहाणीचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला.
या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धांत गायकवाडने कथितपणे चार मारेकऱ्याना परशुराम रणसूर आणि हराल यांना धडा शिकवण्यासाठी 5 लाखांची सुपारी दिली होती. त्यानंतर चार आरोपींनी दादरमध्ये रणसुर आणि हराळ यांच्यावर लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला
प्रकरण थोडक्यात
वंचित बहुजन युवक आघाडी मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर शनिवारी 27 मेला प्राणघातक हल्ला करण्यात आला. दादरमधील आंबेडकर भवन परिसरात झालेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणात भोईवाडा पोलिसांनी कलम 326 , 307 हत्येचा प्रयत्न अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली