Mumbai Crime: धक्कादायक! नात्याला काळीमा फासणारी घटना मुलीनेच केली जन्मदात्या आईची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lalbaug Dead body Case

Mumbai Crime: धक्कादायक! नात्याला काळीमा फासणारी घटना मुलीनेच केली जन्मदात्या आईची हत्या

मुंबईच्या लालबाग परिसरातील पेरू कंपाऊंड परिसरात एका 53 वर्षीय महिलेचा मृतदेह पोत्यात भरलेला आढळून आला आहे. यामहिलेचा मृतदेह पोत्यात भरल्यानंतर कपाटात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबईतील लालबाग परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी मृत महिलेच्या २१ वर्षीय मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मृत महिलेच्या भावाने कालचौकी पोलिस ठाण्यात महिला हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिस अधिकारी तपासासाठी घराचा शोध घेतला असता एका कपाटात प्लास्टिकच्या पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी देलेल्या माहिती नुसार, महिलेच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील अपार्टमेंटची झडती घेतली असता तिचा कुजलेला मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला आढळून आला.

पोलिसांनी सध्या महिलेच्या २१ वर्षीय मुलीला अटक केली आहे. मुलीनेच आईच्या हत्येचा आरोप केला असून तिच्याविरुद्ध कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान गेल्या मागील वर्षी देखील दिल्लीत आफताबने श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे करून तिची हत्या केली होती. याशिवाय त्याने मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेऊन तो मध्यरात्री जंगलात फेकून देत होता. श्रद्धाच्या हत्येच्या 5 महिन्यांनंतर खुनाचा उलगडा झाला.

टॅग्स :police