Exclusive | आरटीओ सेवा प्रवेशोत्तर परिक्षेच्या उत्तरपत्रिका गहाळ; 23 मुख्य आणि 19 पुरवणी उत्तरपत्रीकेचा हिशोब लागेना

Exclusive | आरटीओ सेवा प्रवेशोत्तर परिक्षेच्या उत्तरपत्रिका गहाळ; 23 मुख्य आणि 19 पुरवणी उत्तरपत्रीकेचा हिशोब लागेना

मुंबई - मोटार वाहन विभागातील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांची सेवा प्रवेशोत्तर विभागीय परिक्षा गेल्या महिन्यात घेण्यात आली. यामध्ये परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणी उत्तरपत्रिका ठाणे आरटीओ विभागाला दिल्या. मात्र, परिक्षेनंतर शिल्लक उत्तरपत्रिका आयुक्त कार्यालयाला परत करणे अपेक्षित असताना, त्यातील शिल्लक उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

परिवहन विभागातील सेवेत रुजू होताना, सेवा प्रवेशोत्तर विभागीय परिक्षा घेतली जाते. या परिक्षा गेल्या महिन्यात पार पडल्या आहे. त्यासाठी परिक्षेचे मुख्य नियंत्रक अधिकारी पदाची जबाबदारी ठाणे आरटीओ अधिकारी रवी गायकवाड यांना सोपविण्यात आली होती. तर परिक्षेसाठी 500 मुख्य उत्तरपत्रिका आणि 2000 पुरवणी उत्तरपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यापैकी 262 मुख्य उत्तरपत्रिका आणि 571 पुरवणी उत्तरपत्रिकेचा वापर झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र, त्यापैकी काही उत्तरपत्रीकेचा हिशोबच अद्याप लागला नाही.

त्यामध्ये शिल्लक फक्त 215 मुख्य उत्तरपत्रिका आणि 1410 पुरवणी उत्तरपत्रिकाच आयुक्त कार्यालयाला परत केल्या, तर अद्याप 19 पुरवणी उत्तरपत्रिका आणि 23 मुख्य उत्तरपत्रिका गायब असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिकेचा गैरवापर होण्याची शक्‍यता असून, परिवहन विभागातील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रवेशोत्तर परिक्षेवर प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 
------------ 
कारवाई शून्य 
परिक्षा नियंत्रकांकडून यासंदर्भात पोलिस प्रशासनामध्ये तक्रार करणे आवश्‍यक होते किंवा परिवहन विभागाला तसे कळवणे आवश्‍यक होते. मात्र, ठाणे आरटीओ कार्यालयाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. 
--------------- 
ठाणे आरटीओ वादाच्या भोवऱ्यात 
परिवहन मंत्र्यांनी अचानक केलेल्या दौऱ्यात कार्यालयीन वेळेत हजर न राहणे, आरटीओ कार्यालयात नागरिकांसाठी मदत कक्ष नसणे, एजंट आणि बाहेरील नागरिकांचा विनाकामाने आरटीओ परिसरात आढळून येणे, महसुली उत्पन्नात घट, रस्ता सुरक्षेकडे दुर्लक्ष अशा अनेक आरोपांवर परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ठाणे आरटीओ रवी गायकवाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, अद्याप गायकवाड यांनी आयुक्तांना यासर्व प्रकरणावर खुलासा केला नसल्याने, आता नवीन उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणात गायकवाड अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. 

कार्यालयीन वेळेत म्हणजेच सोमवारी फाईल बघून यावर प्रतिक्रिया देता येईल, फाईल न बघता कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. 
- अविनाश ढाकणे,
आयुक्त, परिवहन विभाग

-----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai latest marathi Missing RTO service entrance exam answer sheets live news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com