#MegaBlock : मुंबईत उद्या रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

#MegaBlock : मुंबईत उद्या रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबईत उद्या रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी मुंबईतील लोकल रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बरवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे, उद्या जर तुम्ही ट्रेनने कुठे जायचा प्लॅन करत असाल तर हे वेळापत्रक अत्यंत महत्त्वाचं आहे. 

मध्य रेल्वे 

मध्य रेल्वेवर सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 पर्यंत कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे CSMT दिशेने जाणाऱ्या फास्ट ट्रेन दिवा ते परळ स्टेशनदरम्यान स्लो ट्रॅकवर चालवल्या जाणार आहेत. रत्नागिरी - दादर पॅसेंजर ट्रेन उद्या दिवा स्थानकापर्यंतच चालवण्यात येईल आणि ही गाडी दिवा स्थानकातूनच रत्नागिरीसाठी निघणार आहे. 

पश्चिम रेल्वे

उद्या पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन या दोन्ही जलद मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दु.३.३५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकवर चालवल्या जातील. उद्याच्या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.  

हार्बर मार्ग

उद्या हार्बर मार्गावर सकाळी 11.30  ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत पनवेल ते वाशीदरम्यान दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, सकाळी 11.06 ते दुपारी 4.00 पर्यंत पनवेल ते सीएसएमटी आणि सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 पर्यंत CSMT ते पनवेल, बेलापूरला जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी 10.12 ते दुपारी 3.53 पर्यंत पनवेल ते वाशी दरम्यानच्या अप-डाऊन फेऱ्याही रद्द राहतील

ट्रान्स हार्बर

सकाळी 11.14 पासून दुपारी 3.20 पर्यंत पनवेल-ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बरवरील ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, ठाणे ते वाशी, नेरुळपर्यंतच्या लोकल फेऱ्या नियमितपणे धावतील. 

सकाळी 11.45  ते 2.45 पर्यंत नेरुळ ते खारकोपर आणि दुपारी 12.15 ते दुपारी 3.15 पर्यंतच्या खारकोपर ते नेरुळदरम्यानच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

WebTitle : mumbai local train megablock details in detail

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com