लोकलमधील "आवाज' डेंजर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मुंबई : विश्‍वास ठेवा अगर ठेवू नका, तुमचा आमचा आवाज बंद करणारे हे भयाण वास्तव आहे. नेहमीच्या लोकल प्रवासामुळे आपण हळूहळू बहिरे होत आहोत. प्रवासातले ध्वनिप्रदूषण आपले आरोग्य बिघडवत आहे. स्थानकावरील उद्‌घोषणा, धावत्या लोकलमधील उद्‌घोषणा, डब्यात रंगणारे गप्पांचे फड, शेजारून धडधडत जाणारी रेल्वे, डब्यात वाद्य वाजवणाऱ्या, गाणाऱ्या भिकाऱ्यांचा आवाज आणि भजनी मंडळींचे भजन-कीर्तन... असे अनेक प्रकारचे आवाज आपले शत्रू आहेत. प्रवाशांना येणाऱ्या स्थानकाची माहिती देणाऱ्या लोकलमधील उद्‌घोषणांच्या आवाजाची पातळी 70-90 डेसिबलपर्यंत. प्रवाशांच्या गप्पांचा आवाज 82 डेसिबलपर्यंत.

मुंबई : विश्‍वास ठेवा अगर ठेवू नका, तुमचा आमचा आवाज बंद करणारे हे भयाण वास्तव आहे. नेहमीच्या लोकल प्रवासामुळे आपण हळूहळू बहिरे होत आहोत. प्रवासातले ध्वनिप्रदूषण आपले आरोग्य बिघडवत आहे. स्थानकावरील उद्‌घोषणा, धावत्या लोकलमधील उद्‌घोषणा, डब्यात रंगणारे गप्पांचे फड, शेजारून धडधडत जाणारी रेल्वे, डब्यात वाद्य वाजवणाऱ्या, गाणाऱ्या भिकाऱ्यांचा आवाज आणि भजनी मंडळींचे भजन-कीर्तन... असे अनेक प्रकारचे आवाज आपले शत्रू आहेत. प्रवाशांना येणाऱ्या स्थानकाची माहिती देणाऱ्या लोकलमधील उद्‌घोषणांच्या आवाजाची पातळी 70-90 डेसिबलपर्यंत. प्रवाशांच्या गप्पांचा आवाज 82 डेसिबलपर्यंत. लोकलमध्ये आलेल्या वादकाच्या ढोलकीचा आवाज 97 डेसिबल आणि आपल्या कानांची क्षमता 50 ते 70 डेसिबल आवाज सहन करण्याएवढी. म्हणजे आपले कान रोजच अत्याचार सहन करतात. 

लोकल प्रवासातील ध्वनिप्रदूषणाचा प्रवाशांच्या आरोग्यावर किती परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी "सकाळ'ने आवाज फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुमेरा अब्दुल अली यांच्या साह्याने हार्बर आणि मध्य रेल्वेवर 29 मार्चला टेस्ट ड्राईव्ह घेतला. त्या दोन तासांच्या प्रवासातील या नोंदी. 

टेस्ट ड्राईव्ह....1 - वांद्रे ते सीएसटी 
वेळ : 01.06 
वांद्रे स्थानक (मशिदीचा भोंगा) : 84.9 डेसिबल 
वांद्रे ब्रिज : 87 डेसिबल 
माहीम जंक्‍शन: 97.2 डेसिबल 
(या वेळी डब्यात वादक शिरतो... ढोल, बाजा आणि घुगरांचा आवाज येतो.) 
- वादक जवळ येतो, आवाज : 97.9 डेसिबल 
- ट्रेन थांबते : 75.5 डेसिबल 
- वडाळा रोड (ट्रेन थांबते) : 68.8 डेसिबल 
- शिवडी (ट्रेन थांबते) : 66.6 डेसिबल 
- ट्रेन वेग घेते : 83 डेसिबल 
- कॉटन ग्रीन : 73.3 डेसिबल 
- रे रोड : 72 डेसिबल 
- डॉक यार्ड ब्रिज : 82.3 डेसिबल 
- मस्जिद : 70.1 डेसिबल 
- सीएसटी स्थानक, हॉर्न वाजतो : 92.7 डेसिबल 
- अपंगांच्या डब्याजवळचा बीप : 92.1 डेसिबल 

टेस्ट ड्राईव्ह...2 - सीएसटी-ठाणे ड्राईव्ह 
- 2.42 आसनगाव फास्ट लोकल... 
- सीएसटी स्थानक सोडल्यावर सहा वेळा उद्‌घोषणा : 82.3 डेसिबल 
- मशीद बंदर ते सॅंडहर्स्ट रोडदरम्यान कोणतीही घोषणा नाही 
- भायखळा स्थानक जवळ येतानाच सहा वेळा उद्‌घोषणा 
- भायखळा स्थानक 79.4 डेसिबल 
- प्लॅटफॉर्मवर घोषणा : 87.4 डेसिबल 

टेस्ट ड्राईव्ह...3 - भायखळा ते दादर 
- भायखळा स्थानक सोडल्यावर तीन वेळा उद्‌घोषणा 
- ट्रेन वेग घेते : 91.6 डेसिबल 
- लोकल दादर स्थानकामध्ये प्रवेशताना : 74.1 डेसिबल 

टेस्ट ड्राईव्ह...4 - दादर-कुर्ला 
- दादर स्थानक सोडल्यानंतर कुर्ला स्थानकापर्यंत तीन वेळा उद्‌घोषणा 
- दादर-कुर्ल्यादरम्यान शेजारून ट्रेन जाते : 91.02 डेसिबल 
- माटुंगा स्थानकामधून लोकल बाहेर पडते : 72 ते 76 डेसिबल 
- कुर्ला स्थानक येण्याआधी सहा वेळा उद्‌घोषणा 
- कुर्ला स्थानकामध्ये लोकल शिरते : 73 डेसिबल 
- प्रवाशांच्या गप्पा : 82 डेसिबल 
- घाटकोपर स्थानकामध्ये लोकल शिरते... तीन वेळा उद्‌घोषणा : 82.7 डेसिबल 
- घाटकोपर स्थानकामध्ये लोकल पोहोचते : 71.9 डेसिबल 
- घाटकोपर स्थानकामधून लोकल सुटते : 76.3 डेसिबल 

टेस्ट ड्राईव्ह...5 - घाटकोपर-मुलुंड 
- घाटकोपरहून लोकल सुटते : 76.3 डेसिबल 
- मुलुंड स्थानकाला पोहोचण्याआधी तीन वेळा उद्‌घोषणा 
- नाहूर-मुलुंडदरम्यान शेजारून ट्रेन जाताना : 74.8 डेसिबल 
- मुलुंड स्थानकाला पोहचण्याआधी तीन वेळा उद्‌घोषणा 
- मुलुंड स्थानकाहून ठाण्याकडे निघताना तीन वेळा उद्‌घोषणा 
- ठाणे स्थानकाला पोहचताना : 72.3 डेसिबल 
- ठाणे स्थानक : 86.7 डेसिबल 

रेल्वेला अहवाल 
या टेस्ट ड्राईव्हमधील निष्कर्ष रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. प्रवाशांनीही या ध्वनिप्रदूषणाविरोधात तक्रारी करायला हव्यात, तरच ही समस्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत जाईल. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाही या ड्राईव्हची आकडेवारी ट्‌विट करण्यात आली आहे, असे सुमेरा अब्दुल अली यांनी सांगितले. 

लाखो मुंबईकर लोकलने प्रवास करतात. दोन ते तीन तासांच्या प्रवासात अनेकदा त्यांना 70 डेसिबलपेक्षा अधिक आवाज सहन करावा लागतो. त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार औद्योगिक कामगारांनी आठ तासांपेक्षा अधिक काळ 85 डेसिबलपर्यंतच्या आवाजात काम करणे धोकादायक आहे. लोकल प्रवाशांना याहून अधिक आवाज ऐकावा लागतो. प्रवासातील या ध्वनिप्रदूषणाचा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. 
- सुमेरा अब्दुल अली, संस्थापक, आवाज फाऊंडेशन 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 80 डेसिबलपेक्षा जास्त आवाज आठ तासांपेक्षा अधिक ऐकू नये. निसर्गाने कानात स्नायूंची विशिष्ट रचना केली आहे. गरजेपेक्षा जास्त आवाज कानावर आल्यास कानातील स्नायू आकुंचन पावतात. अर्थात प्रत्येकाच्या स्नायूंची क्षमता वेगळी असते. दररोज डिस्को थेक किंवा पबमध्ये जाणाऱ्यांना वर्षानंतर बहिरेपणा आल्याचीही काही उदाहरणे आहेत. 
- डॉ. संजय छाब्रिया, नायर रुग्णालय  
 

Web Title: mumbai local train noise pollution