पावसात लोकलच्या 300 फेऱ्या कमी? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई - मुसळधार पावसात रेल्वे रुळांवर साचणारे पाणी, लोकलमध्ये होणारा बिघाड, यामुळे होणारा प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी म्हणून तीनशे फेऱ्या कमी करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करत आहे. 

मुंबई - मुसळधार पावसात रेल्वे रुळांवर साचणारे पाणी, लोकलमध्ये होणारा बिघाड, यामुळे होणारा प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी म्हणून तीनशे फेऱ्या कमी करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करत आहे. 

वेधशाळेकडून 48 तासांचा अंदाज घेऊन लोकल वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. प्रवाशांनी याला विरोध केला असून, कमी फेऱ्या देऊन रेल्वे प्रशासन मुद्दाम प्रवाशांचा खोळंबा करत असल्याचा आरोप केला आहे. पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडते. गाड्या खोळंबतात, पाऊस ओसरल्यानंतर गाड्या कारशेडला लावण्यात बराच वेळ जातो. पाणी साचल्याने गाड्यांमध्येही बिघाड होतो. पावसातील ही तारांबळ टाळण्यासाठी रविवारी घेतल्या जाणाऱ्या "मेगाब्लॉक'चे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेत आहे. ज्या दिवशी असे वेळापत्रक लागू करण्यात येईल, त्या दिवसाची माहिती नागरिकांपर्यंत उद्‌घोषणेद्वारे पोचवली जाईल, असेही ते म्हणाले. 

मध्य रेल्वेच्या फेऱ्या 
नियमित फेऱ्या - 1732 
रविवारच्या फेऱ्या - 1384 

Web Title: mumbai local trains in 300 rounds less