मुंबई लोकलवर दगडफेकीचे संकट 

मुंबई लोकलवर दगडफेकीचे संकट 

मुंबई, ता. 26 : मुंबईत लोकलवर दगडफेकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील साडे सहा वर्षांत तब्बल 118 दगडफेकीच्या घटना घडल्या असून यात 113 प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या 118 प्रकरणातील केवळ 21 प्रकरणे सोडविण्यातच रेल्वेच्या जीआरपीला यश आले आहे. त्यामुळे दगडफेकीच्या घटनांवर रोख लावण्यासाठी रेल्वे पोलिस अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. 

मुंबईच्या लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन समजली जाते. दररोज सुमारे एक कोटींहून अधिक प्रवासी यातून प्रवास करतात. त्यामुळे या गाड्यांत गर्दीदेखील खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, अशात मागील काही वर्षांतील दगडफेकीच्या घटनांमुळे तर मुंबईकरांचा प्रवास आणखीनच अवघड झाला आहे. 2013 ते जून 2019 या कालावधीत तब्बल 118 दगडफेकीच्या घटनांमध्ये 113 प्रवासी जखमी झाले आहेत.

यात कर्जत ते सीएसएमटीदरम्यान 84 दगडफेकीच्या घटनांमध्ये 81 प्रवासी जखमी झाले आहेत, या घटनांतील केवळ 15 प्रकरणे सोडविण्यात जीआरपीला यश आले; तर हार्बर रेल्वे मार्गावर वडाळा ते पनवेलदरम्यान 21 दगडफेकीच्या घटनांमधील केवळ पाच प्रकरणे सोडविण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. तसेच पश्‍चिम रेल्वे मार्गावरील पालघर ते चर्चगेटदरम्यान 12 दगडफेकीच्या घटनांत 14 प्रवासी जखमी झाले असून यातील केवळ एक प्रकरण जीआरपीमार्फत सोडविण्यात आले आहे.

त्यामुळे एकदंरीत माहितीवरून दगडफेकीच्या घटना सोडविण्यासाठी रेल्वे पोलिस अपयशी झाल्याचे दिसून येत आहे. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी माहिती अधिकाराच्या आधाराने समोर आणली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com