Wed, June 7, 2023

Mumbai News : मागाठाणे झोपडपट्टीवासियांकडून लाखोंची लाच; दरेकर यांचा आरोप
Published on : 18 March 2023, 4:17 pm
मुंबई - मागाठाणे येथे झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करताना नागरिकांकडून कर्मचारी लाच मागत असल्याबाबत भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांच्या आरोपासंदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.
दरेकर यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत ही माहिती दिली. जाणुपाडा, पांडे कंपाऊंड, चिखलवाडी येथे बायोमॅट्रिक सर्वेक्षणादरम्यान पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून पैसे परत करण्याची मागणी त्यांनी केली. याप्रकरणी संबंधित यंत्रणेला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. अशा पद्धतीने सर्वसामान्यांना कुणी नाहक वेठीस धरत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, असे उत्तर शंभूराजे देसाई यांनी दिले.