लेखी आश्वासनांची अमलबजावणी न झाल्यास आंदोलन अधीक तीव्र - येचुरी

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 13 मार्च 2018

मुंबई - मुंबईतल्या शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सीताराम येचुरी मुबंईत आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांना लेखी हमी देत त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शोतकरी लाँग मार्च हा ऐतिहासिक संघर्ष आहे. तसेच शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे सरकारने लेखी आश्वासन दिले असून, त्याची दिलेल्या वेळेत अमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे येचुरी यांनी म्हटले आहे. तसेच, असे न झाल्यास पुढचे आंदोलन अधीक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला. 

दरम्यान, 2016मध्ये नाशिकमध्ये घेराबंदीच्या स्वरुपात शेतकरी आंदोलन तीव्र झाल्याची त्यांनी आठवण करुन देत, सरकारने त्यावेळी शेतकऱ्यांबरोबर एक बैठक घेतली होती. परंतु, बैठकीत देण्यात आलेले आश्वासन सरकाने पूर्ण केले नसल्याचे त्यांनी सांगितले. आता असे झाल्यास यापूढे होणारे आंदोलन तीव्र स्वरुपाचे असेल, तसेच ते शेतकरी आणि आदिवासी वर्गापर्यंत मर्यादित न राहता त्याला जनआंदोलनाचे स्वरुप येईल असेही सीताराम येचूरी म्हणाले. 

भारताचा कणा हा शेतकरी असून, त्याच्या शिवाय देशाला भवितव्य नाही असे सांगत शेतकरी जगला नाही तर कुणीच जगणार नाही असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. 

Web Title: mumbai maharashtra farmer long march sitaram yechuri