esakal | Mumbai: मंत्रालयात प्रतिक्षालय उभारण्यास एमएमआरसीचे स्वारस्य
sakal

बोलून बातमी शोधा

Mantralay

मुंबई : मंत्रालयात प्रतिक्षालय उभारण्यास एमएमआरसीचे स्वारस्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यभरातून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी भव्य प्रतिक्षालय उभारण्यासाठी आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने स्वारस्य दाखवले आहे. मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारत येथे भूमिगत मार्ग उभारण्यात येत असल्याने प्रतिक्षालय उभारण्याचे कामही एमएमआरसीकडून करण्यासही सार्वजनिक बांधकाम विभागाने अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी काही वर्षात दोन मजली प्रतिक्षालय प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याने दिली.

एमएमआरसीद्वारे कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 चे काम करण्यात येत आहे. मंत्रालयापासून भूमिगत मेट्रो मार्ग जात आहे. त्याचप्रमाणे येथे भूमिगत पार्किंग उभारण्यात येत आहे. तसेच मंत्रालय आणि प्रशासकीय इमारतीला जोडणारा भूमिगत मार्गही बांधला जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारण्यात येणारे प्रतिक्षालय उभारण्याचा प्रस्ताव एमएमआरसीने दिला आहे.

हेही वाचा: मुंबई : लवकरच एसटीच्या पती-पत्नी एकत्रिकरणाच्या बदल्या होणार

या प्रस्तावाला अबंधकाम विभागाने अनुकूलता दर्शवली असल्याने येथील प्रतिक्षालयाचे काम एमएमआरसीमार्फत करण्यात येणार आहे. या प्रतिक्षालयासाठी 219 कोटींची प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. यामध्ये 900 चौरस मीटर जागा अभ्यागतांसाठी असेल. या जागेत सुमारे 700 अभ्यागतांची व्यवस्था होईल.

येथील भूमिगत पार्किंगचे काम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे मंत्रालयात होणारी गर्दीही आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे.

loading image
go to top