मुंबईच्या भूगोलातील इंचाचा बदल समजणार

शहरांचा विकास करताना आतापर्यंत कागदाचे नकाशे वापरले जात होते
mumbai
mumbaisakal

मुंबईत एखादा मोकळा भूखंड दिसला की भूमाफियांनी तो गिळंकृत केलाच, असे चित्र पूर्वी होते; परंतु या सर्व प्रकारांना आता चाप बसणार आहे. मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीत इंचाचा बदल झाला तरी तो महापालिकेला समजणार आहे. शहराच्या ‘थ्री-डी मॅपिंग’मुळे (त्रिमितीय नकाशा) हे शक्य होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर वरळी येथे हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील बेकायदा बांधकामेही या तंत्रज्ञानाने ओळखता येणार आहेत. शहराच्या प्रत्येक सेंटिमीटरची अचूक मोजणी यातून होणार असल्याने त्याचा फायदा नियोजनात होणार आहे.

शहरांचा विकास करताना आतापर्यंत कागदाचे नकाशे वापरले जात होते. मात्र, आता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ‘त्रिमितीय’ नकाशांच्या आधारे मुंबईचा विकास करण्यात येणार आहे. वरळीतील १० चौरस किलोमीटरचे सर्वेक्षण त्रिमितीय नकाशाद्वारे तयार करण्यात आले आहे. त्यातून डिजिटल स्वरूपात प्रतिवरळीच तयार करण्यात आली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाची पाहाणी केली आहे. अशा तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासनाला वेग देतानाच नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासही मदत होईल, असे अतिरिक्त आयुक्त अश्‍विनी भिडे यांनी सांगितले. त्रिमितीय नकाशाचा उपयोग आपत्ती व्यवस्थापनात तर होईलच. शिवाय आपत्ती घडलेल्या भागाचा नकाशा संगणकावर उपलब्ध होणार आहे. पर्यावरण संवधर्न आणि रक्षणासाठीही या नकाशाचा फायदा होणार आहे. शहराच्या प्रत्येक सेंटिमीटरची मोजणी यात अचूक होणार आहे. त्यामुळे शहराच्या नियोजनात त्याचा फायदा होईल.

mumbai
मुंबई : बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्‍या तरुणाला पोलिस कोठडी

काय फायदा?

  • शहरातील भौगोलिक परिस्थितीत झालेले लहान-मोठे बदलही समजणार

  • शहरातील चढ-उतार कायम ठेवणे शक्य होणार.

  • पायाभूत सुविधांचे अधिक चोख पद्धतीने नियोजन होईल

  • वातावरणातील बदलांचे विश्‍लेषण करणे सुलभ होणार

त्रिमितीय नकाशांमुळे परिसराचे आभासी, पण हुबेहूब रूप पाहता येणार आहे. ३६० अंशात अवलोकन करून उंची, रुंदी, खोली, जाडी अशा सर्व पैलूंनी तो परिसर पाहता येणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल झाला तरी लागलीच पडताळणी करता येणार आहे.

- शरद उघडे, सहाय्यक आयुक्त, ‘जी दक्षिण’ विभाग, तथा संचालक, माहिती तंत्रज्ञान विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com