Coronil Patanjali | पतंजलीच्या कोरोनीलवरून केंद्रीय आरोग्य मंत्री IMA च्या रडारवर

Coronil Patanjali | पतंजलीच्या कोरोनीलवरून केंद्रीय आरोग्य मंत्री IMA च्या रडारवर

मुंबई - पतंजली निर्मित कोरोनील औषधाला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असल्याचे सांगितल्याने आय एम ए संघटनेने आश्चर्य व्यक्त केले आहे. कोरोनील औषधाचे ट्रायल कधी झाली , या औषधाला वैज्ञानिक अधिष्ठान काय ? शिवाय स्वतः डॉक्टर असलेल्या आरोग्य मंत्र्यांनी कोणत्या आधारावर कोरोनील औषधाला मान्यता देत असल्याचा सवाल ही केंद्रीय इंडियन मेडिकल असोसिएशन कडून उपस्थित करण्यात आला आहे. 

रामदेव बाबा यांच्या पतंजली औषध निर्माण केलेल्या कंपनीने कोरोनील या औषधाची निर्मिती केली असून हे औषध कोरोनावर उपचार करणारे असल्याचा दावा केला आहे . पतंजलीने केलेल्या या दाव्याला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी समर्थन दिले आहे . शिवाय जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनील औषधाला मान्यता दिली असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले . मात्र यावर बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉ. जयेश लेले यांनी सांगितले कि , जागतिक आरोग्य संघटनेने संघटनेच्या होम ट्विट वर कोणत्याही पारंपरिक पद्धतीच्या औषधाला संघटनेने प्रमाणित केले नाही असे स्पष्ट म्हटले आहे.  या उलट कोरोनीलच्या ट्रायल बाबत पतंजली कंपनीने किंवा कोणीही काही स्पष्टीकरण दिले नसल्याचे हि ते म्हणाले . 

तर आय एम ए चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी सांगितले कि , कोरोनीलला कोणतीही मान्यता नाही हे दाखवून दिल्यावर ते मागे घेण्यात आले होते . आता तर हे औषध प्रभावी असून 154 देशात वितरित करणार असे सांगितले जात आहे . केंद्रीय आरोग्य  मंत्री डॉक्टर असून ही त्या औषधाचा कोणतीही मान्यता नसून प्रचार करत आहेत हे चुकीचं आहे. या औषधाबाबत परिक्षण करणे आवश्यक असल्याचे डॉ . भोंडवे यांनी स्पष्ट केले. 

जग आता रोबोटिक कडे जात आहे आणि त्याच वेळी लोकांना त्या औषधाची कोणीही शाश्त्र शुद्ध माहिती न  देता प्रचार करत आहेत . काही दिवसांपूर्वी देखील कोरोनील औषधांबाबत असेच प्रचार होत होते मात्र तो प्रयत्न आम्ही हाणून पडला. यातून सर्वसामान्यांच्या जीवाला धोका अधिक आहे. या औषध बाबत वैज्ञानिक मान्यता नाही, याला काही पुरावे असल्यास ते द्यावेत असे डाॅ. लेले यांनी स्पष्ट केले आहे.

--------------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

mumbai marathi latest patanjalis coronel to Union Health Minister IMAs Objection coronavirus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com