देवनारला वीजनिर्मितीचा सर्वात महाप्रकल्प; BMC चा महत्वपूर्ण निर्णय

देवनारला वीजनिर्मितीचा सर्वात महाप्रकल्प; BMC चा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई  : देवनार डम्पिंगवर 600 मेट्रीक टन कचऱ्यापासून वीजनिर्मीतीच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर आता 1200 मेट्रीक टन कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा महाप्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी जागतिक स्तरावरील निविदा मागवण्यात आल्या आहेत. 

देवनार डम्पिंगची क्षमता संपल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणी कचरा टाकण्यास बंदी आणली होती. मात्र, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कचरा टाकण्याची परवानगी देण्याची विनंती महापालिकेने होती. त्यानुसार न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. त्यामुळे भविष्यात देवनार डम्पिंग ग्राऊंडवर उघड्यावर कचरा टाकला जाणार नाही, तर कचऱ्यापासून वीजनिर्मीती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 600 मेट्रीक टनचा प्रकल्प उभारला जाणार असून तो 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर आता महापालिकेने 1200 मेट्रीक टन कचऱ्यापासून वीजनिर्मीती करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी जागतिकस्तरावरील निविदा आज प्रसिद्ध केल्या आहेत. 600 मेट्रीक टन प्रकल्पासाठी महापालिका 1200 कोटी रुपये खर्च करणार आहे. 
मुंबईत दररोज 5900 मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होते. त्यातील दीड ते दोन हजार मेट्रीक टन कचरा सध्या देवनारला टाकला जात आहे. या कचऱ्यापासून वीज निर्मीती प्रकल्पाबरोबरच महापालिका राडारोड्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणार आहे. मुंबईत रोज सुमारे 1200 मेट्रीक टन राडारोडा तयार होते. 

अतिरिक्त वीज विकणार ? 
1800 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया अंदाजे 8 ते 10 मेगावॅट वीज निर्माण होणार आहे. ही वीज प्रकल्प चालवण्यासाठी वापरली जाणार आहे. अतिरिक्त वीज खुल्या बाजारात विकलीही जाऊ शकते, अथवा पालिकेच्या कामांसाठीही वापरली जाऊ शकते. 

mumbai marathi news Deonar has the largest power generation project Important decision of BMC

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com