रेल्वे स्थानकांचा अहवाल आठवडाभरात देणार

मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेच्या कल्याणपुढील आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानकांना भेट देत रेल्वेच्या विविध विभागातील अधिकारी वर्गाने सर्वे आणि पाहणी केली. आठवडाभरात देेणार अहवाल...

कल्याण : एल्फिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर रेल्वेच्या सर्व पादचारी पुलांचे आठवड्याभरात ऑडिट करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी दिले होते, त्यानुसार कल्याण पुढील रेल्वे स्थानकामधील सर्वे आज मंगळवार 3 ऑक्टोबर 2017 पासून सुरू झाला असून, त्याचा अहवाल, एक आठवड्यात देण्यात येणार आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मध्य, पश्चिम, मुंबई रेल्वे विकास महामंडळ MRVC च्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकमधील आदेश दिल्यानंतर आज मंगळवार ता 3 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी कल्याण पुढील शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकात सर्वे केला यात पालिका अधिकारी समवेत रेल्वे स्टेशन मास्तर, सुरक्षा बलाचे कमिशनर मुंबई असिस्टंट चीफ सेक्रटरी जॉर्ज बा, कल्याण सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक अरविंद्र कुमार, रेल्वे पोलीस उपनिरीक्षक ए. आंधळे, जे डी पाठक, रेल्वे अधिकारी जगदीश प्रसाद, वाणिज्य विभाग संदीप तिवारी, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाचे पदाधिकारी राजेश घनघाव, श्याम उबाळे, अंनता ढोणे, अनिल त्रिपाठी, चंद्रकांत वाढविंदे, संदीप पाटील आदींनी सहभाग घेतला.

शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकात फेरीवाला, गर्दुल्ले आणि कचरा प्रश्न जिकरीचा असून पालिका, सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात येणार आहे. शहाड रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात अतिक्रमण झाले असून रेल्वे लाईन लगत कचरा टाकला जातो, जुन्या पादचारी पूल दुरुस्ती करावी, वाहन पार्किंगमुळे रेल्वे स्थानक जिकरीचे झाले असून शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानक मध्ये दुर्घटना झाल्यास मदतकार्य देण्यास उशीर होतो त्यामुळे पर्यायी व्यवस्था करणे काळाची गरज आहे. शहाडच्या नवीन पुलावर सुरक्षासाठी जाळ्या बसविणे, रेल्वे लाईन ओलांडून प्रवास करणाऱ्यावर कारवाई करणे, तसेच आंबिवली रेल्वे स्थानक बकाल झाले असून त्याचे नूतनीकरण करावे, रेल्वे च्या जागा ताब्यात घेऊन वाहन पार्किंग करावे, पादचारी पूल बांधावे, जुने दुरुस्त करावे आदी विषयावर पाहणी आणि सर्वे दरम्यान चर्चा करण्यात आली.

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या आदेश नुसार मध्य रेल्वे स्थानकाच्या दरम्यान पाहणी आणि सर्वे सुरू असून एक आठवड्यात अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. सध्या काय परिस्थिती आहे आणि काय सुधारणा हवी याचा अहवाल मध्ये समावेश करण्यात येणार असून तद्नंतर आंनलबजावणी ही करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी सकाळला दिली.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या दुर्घटनेनंतर उशिरा का होईना रेल्वे प्रशासनाला जाग आली, आज शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकाची पाहणी केली, प्रवासी वर्गाला अपेक्षित मूलभूत गरजा आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना बाबत रेल्वे च्या अधिकारी वर्गाने प्रवासी संघटनेशी चर्चा करत पाहणी केली अपेक्षा आहे आता तरी आम्हाला सुविधा मिळतील, यासोबत कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गाचे काम ही लवकर होईल यासाठी विशेष मागणी आम्ही केली अशी माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी दिली.

Web Title: mumbai marathi news kalyan railway bridges survey