मुंबईत नाईट कर्फ्यूची शक्यता; महापौरांचे सूचक वक्तव्य

kishori pednekar
kishori pednekar

मुंबई - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये महाराष्ट्र - केरळ या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वेगाने होते आहे. मुंबईतसुद्धा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रविवारी दिवसभरात 1962 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकही घेतली. या बैठकीनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी  प्रतिक्रिया देताना मुंबईत नाइट कर्फ्यूची शक्यतेचं सूचक वक्तव्य केलं आहे. गेल्या तीन दिवसात मुंबईत प्रत्येक दिवशी 15 हून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल हेसुद्धा उपस्थित होते. त्यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनांना भरारी पथके तयार करुन उपहारगृह, बार, पब आणि हॉटेलमध्ये नियमांचे पालन होत आहे का नाही यावर काटेकोर लक्ष ठेवावे अशी सूचना करण्यात आली आहे. लोकल पेक्षा लग्न सोहळे,हॉटेल बार तसेच बाजारांमधून कोविड जास्त पसरत असल्याचा अंदाज महापालिकेनं व्यक्त केला आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हॉटेल व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी नियमांचे कटेकोर पालन करा अथवा कठोर नियम करावे लागतील असे आदेशच दिले आहेत.

काय असू शकतात निर्बंध

  • व्यावसायिक आस्थापने, कार्यालयांमध्ये कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची असावी असं सांगण्यात येऊ शकतं. 
  • मंदिर, दिर्ग्यातील गर्दीवर नियंत्रण
  • सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने घातली जाऊ शकतात

गेल्या आठवड्यात सोमवार, मंगळवारी रुग्णसंख्या एक हजार रुग्णांपेक्षा कमी होती. मात्र बुधवारी 1446 तर गुरुवारी 1393 रुग्ण आढळले. शुक्रवारी मुंबईतच 1572 रुग्ण आढळले होते. शनिवारी मुंबईत वर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली. रविवारी सुद्धा 1900 पेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापालिकेच्या पाच जम्बो रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी रविवारी महापालिकेच्या पाच रुग्णालयांना बेड तयार ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबईत सध्याच्या घडीला 451 पेक्षा जास्त रुग्णांची स्थिती गंभीर आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com