मुंबई महापौरपदासाठी आज निवडणूक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई - महापौरपदाची निवडणूक बुधवारी (ता. 8) दुपारी 12 वाजता होणार असून, शिवसेनेचे विश्‍वनाथ महाडेश्‍वर आणि कॉंग्रेसचे विठ्ठल लोकरे यांच्यात ही लढत आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महाडेश्‍वर यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. 

निवडणूक संपताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नवीन महापौरांची खुल्या बसमधून पालिका मुख्यालयापासून हुतात्मा चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले होते, त्याप्रमाणे ठाकरे नवीन नगरसेवकांसह हुतात्म्यांना वंदन करणार आहेत. 

भाजपने महापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने महापौर निवडणुकीतील चुरस संपली आहे. 84 नगरसेवकांसह चार अपक्ष मिळून शिवसेनेच्या नगरसेवकांचे संख्याबळ 88 झाले आहे. भाजपचे अखिल भारतीय सेना आणि अपक्ष मिळून 84 संख्याबळ आहे. महापौरपदासाठी शिवसेनेचे महाडेश्‍वर आणि कॉंग्रेसचे उमेदवार लोकरे यांच्यात तसेच उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर आणि कॉंग्रेसच्या विनी डिसोझा यांच्यात लढत होईल. 

विरोधी पक्षनेतेपदाचा पेच 
भाजपने विरोधी पक्षनेतेपद नाकारल्यास हे पद कुणाला मिळणार, याविषयी उत्सुकता आहे. महापालिकेचे चिटणीस नारायण पठाडे यांनी सांगितले की, महापौर निवडणुकीसाठी उपस्थित राहणारे पीठासीन अधिकारी याबाबत निर्णय घेतील. आवश्‍यकता भासल्यास कायदेशीर मदत घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपने विरोधी पक्षनेतेपद नाकारल्याने कॉंग्रेसचे गटनेते रवी राजा यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Mumbai Mayor election today