मुंबईच्या महापौर अॅक्शनमोडमध्ये, रेल्वेनं प्रवास करत केली जनजागृती

मुंबईच्या महापौर अॅक्शनमोडमध्ये, रेल्वेनं प्रवास करत केली जनजागृती

मुंबई:  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबईतल्या वेगवगेळ्या भागात , रेल्वे स्थानकांवर जाऊन मास्क वापरण्या संदर्भात आणि कोरोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांविषयी जनजागृती केली आहे.

सद्यस्थितीत मुंबईतील काही विभागांमध्ये वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊनची स्थिती उद्भवू नये याकरिता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज जनजागृती केली. महापौरांनी आज भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धिम्या गतीच्या लोकलने प्रवास करून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. तसेच प्रवाशांना कोरोना बाबतच्या त्रिसूत्रीचे महत्व पटवून दिले.

मुंबई शहरात कोरोना संक्रमण वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड(मुलुंड), आर सेंट्रल(बोरिवली), एम वेस्ट(चेंबुर, टिळक नगर) या चार वॉर्ड मध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. या वॉर्डमध्ये दररोजच्या रुग्णसंख्येत 10 ते 15% वाढ होत आहे. चेंबूर, टिळक नगर आणि मुलुंड भागात रुग्ण संख्यावाढीचा दर सर्वाधिक 0.26% इतका आहे. त्यामुळे पालिकेनं या भागातल्या काही इमारतींना नोटिसा देखील बजावल्या आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Mumbai Mayor Kishori Pednekar action mode Appeal Wear masks Byculla station

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com