मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा कोरोना चाचणी अहवाल आला

पूजा विचारे
Thursday, 10 September 2020

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल आला असून तो पॉझिटिव्ह आला आहे.  ट्विट करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

मुंबईः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल आला असून तो पॉझिटिव्ह आला आहे.  ट्विट करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भायखळा येथील महापौर बंगल्यातच गृहविलगीकरण करण्यात आले आहे.

त्यांनी ट्विट केलं की, मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन. 

 

किशोरी पेडणेकर यांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. दरम्यान आता महापौरांसोबत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचेही स्वॅब टेस्ट घेण्यात येतेय. 

कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात किशोरी पेडणेकर स्वत: ऑनल फिल्ड जाऊन काम करताहेत. कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या जवळपास सर्वच रुग्णालयांना भेटी दिल्यात. 

गेल्या काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांचा मोठा भाऊ सुनील कदम यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. 

Mumbai Mayor Kishori Pednekar Corona Positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Mayor Kishori Pednekar Corona Positive