मुंबईचे महापौरच जेव्हा मुलीचा हात पकडतात...! (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

महापौरांच्या कारनाम्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर 
व्हायरल झाल्याने महापौर महाडेश्वर पुन्हा एकदा चांगलेच गोत्यात आले आहेत.महाडेश्वर यांच्या या कृत्याचा सर्वच थरातून निषेध होत आहे.विरोधकांनी ही हा मुद्दा चांगलाच तापावला आहे.मात्र महापौर महाडेश्वर वारंवार विवादात अडकत असल्याने शिवसेनेच्या डोक्यालाही ताप झाला आहे.या प्रकरणानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई : मुंबईचे महापौर पुन्हा एकदा विवादात अडकले आहेत.समस्या जाणून घेण्यासाठी गेलेल्या महापौरांनी आपलं गाऱ्हाणं मांडणाऱ्या मुलीचाच चक्क हात पकडून तिला धमकावलं.सोशियल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून महापौरांच्या विरोधात सध्या निषेधाचा सूर उमटतो आहे.

"...ये दादागिरी करू नकोस,तू ओळखत नाही मला...."हे धमकीचे बोल आहेत. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे.मुसळधार पावसामुळे संताक्रूज मधील पटेल नगर मध्ये विजेचा शॉक लागून आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे संतप्त झालेल्या रहिवाश्यांनी पाश्चिम द्रुतगती मार्ग राखून आपला निषेध नोंदवला होता.पीडित परिवाराचं सांत्वन करण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर सोमवारी पटेल नगर मध्ये आले होते. यावेळी संतप्त झालेल्या रहिवाश्यांनी महाडेश्वर यांना घेराव घालून "...तुम्ही शब्द दिल्या प्रमाणे काल का नाही आलात.घटनेच्या दुसऱ्या दिवशी का आलात.." अश्या प्रश्नांचा भडिमार केला.रहिवाशीयांच्या रोषामुळे कावरेबावरे झालेल्या महापौरांनी प्रश्न विचारणाऱ्या मुलीचाच हात पकडून पिरगळला  आणि तिला धमकावलं.यामुळे संतापलेल्या राहिवाश्यांचं उग्र रूप बघून महापौरांनी काढता पाय घेतला.

महापौरांच्या कारनाम्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर 
व्हायरल झाल्याने महापौर महाडेश्वर पुन्हा एकदा चांगलेच गोत्यात आले आहेत.महाडेश्वर यांच्या या कृत्याचा सर्वच थरातून निषेध होत आहे.विरोधकांनी ही हा मुद्दा चांगलाच तापावला आहे.मात्र महापौर महाडेश्वर वारंवार विवादात अडकत असल्याने शिवसेनेच्या डोक्यालाही ताप झाला आहे.या प्रकरणानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai mayor Vishwanath Mahadeshwar seen manhandling woman