Mumbai Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Mega Block on all three routes on Sunday Passengers suffer railway local train

Mumbai Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगांव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्व -

कुठे- माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर

कधी- सकाळी ११ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

तर ठाणे येथून अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

हार्बर रेल्वे

कुठे - पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर

कधी - सकाळी ११. ०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वे-

कुठे - सांताक्रुज ते गोरेगांव अप- डाऊन जलद मार्गावर

कधी - सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुज ते गोरेगांव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. ब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द असणार आहे.