मुंबई मेट्रो-1च्या प्रवाशांनी लक्ष असू द्या! आता 'या' व्हाट्सअ‍ॅप क्रमांकावर नोंदविता येणार तक्रार

Mumbai Metro
Mumbai Metro

मुंबई - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मेट्रो प्रवाशांना तक्रार नोंदणीसाठी व्हॉट्सअ‍ॅप सेवा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे प्रवाशांनी तक्रार नोंदवताच ७२ तासांच्या आत या तक्रारींचे निवारण करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो १ ने दिली आहे.

Mumbai Metro
Supreme Court News : छत्तीसगडमध्ये आता ५८ टक्के आरक्षण! सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने वर्सोवा आणि घाटकोपर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा सुरु केली आहे. ९९३०३१०९०० या नंबरवर व्हाट्सअ‍ॅप संदेशाद्वारे मेट्रो प्रवासी आपली तक्रार किंवा प्रश्न नोंदवू शकतात. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि व्हॉट्सअ‍ॅप पेजवर सहज स्कॅनिंग करण्यासाठी स्थानकातील सर्व ग्राहक सुविधा केंद्रावर 'QR कोड' ठेवण्याची व्यवस्था केली आहे. मुंबई मेट्रो १ने मेट्रोमधील प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी यापूर्वीच अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात स्थानकांवर ग्राहक सेवा, कॉल सेंटर (०२२-३०३१०९००), ई-मेल (customercare@reliancemumbaimetro.com) आणि सोशल मीडिया (ट्विटर) यांचा समावेश आहे.

Mumbai Metro
Mohit Kamboj : 'पहाटेपर्यंत बारमध्ये मोहित कंबोज होते', संभाजी ब्रिगेडचा दावा; गुन्हा दाखल करण्याची मागणी

तक्रार पाठवताच प्रवाशाला मुंबई मेट्रो वन कडून त्वरित प्रतिसाद मिळेल आणि तक्रार प्राप्त झाल्याची खात्रीही दिली जाईल. जर, मेट्रो १ प्रतिनिधीला मिळालेली माहिती अपूर्ण वाटत असेल तर प्रतिनिधी अतिरिक्त माहिती मागविण्यासाठी विनंती करेल. दिलेल्या माहितीच्या आधारे, पुढील सहकार्यासाठी आणि प्रश्नाचे योग्य निराकरण करण्यासाठी मुंबई मेट्रो वन कॉल सेंटरद्वारे संपर्क साधला जाईल.

ही सुविधा सकाळी ६:३० ते रात्री १०:३० दरम्यान सक्रियपणे उपलब्ध असेल. मुंबई मेट्रो १ कडे तक्रार प्राप्त होताच ७२ तासांच्या आत सर्व प्रश्नांचे निराकरण करेल. याचा वापर करून प्रवासी वेळापत्रक आणि इतर सुविधांबाबत सर्व प्रकारचे अभिप्राय नोंदवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com